भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटने मंगळवारी ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय कुस्तीपटू बनून इतिहास रचला. पॅरिस ऑलिम्पिकमधील महिलांच्या ५० किलो कुस्तीच्या अंतिम फेरीत संपूर्ण देशाला तिच्या उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा असताना, अंतिम दिवशी वजन मोजताना १०० ग्रॅम जास्त वजन आढळल्याने विनेशला अपात्र ठरवण्यात आले. ही बातमी आल्यानंतर लगेचच, इंटरनेटवर या घटनेवर प्रतिक्रिया येऊ लागल्या. या बातमीवर तापसी पन्नू, फरहान अख्तरसह अनेक सेलिब्रिटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. पाहुयात ते कोणकोण आहेत…
आलिया भट्ट
विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिक फायनलमधून अपात्र ठरल्याच्या वृत्तावर प्रतिक्रिया व्यक्त करताना, आलिया भट्टने विनेश फोगटचे कौतुक करताना एक लांब आणि भावनिक नोट लिहिली, “विनेश फोगट तू संपूर्ण देशासाठी प्रेरणा आहेस. तुमची शक्ती कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, कोणतीही गोष्ट तुमची हिम्मत हिरावून घेऊ शकत नाही आणि इतिहास घडवताना तुम्ही ज्या अडचणींचा सामना केलात ते कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. तू सोनं आहेस, तू लोखंड आहेस आणि पोलादही! सदैव चॅम्पियन! तुझ्यासारखे कोणीही नाही.”
फरहान अख्तर
फरहान अख्तरने इंस्टाग्रामवर एका पोस्टमध्ये विनेशचा एक फोटो शेअर केला आहे आणि कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “विनेश तुम्ही किती निराश झाला असाल याची मी फक्त कल्पनाच करू शकतो, पण तरीही पूर्ण समजू शकत नाही. तुमच्यासाठी वाईट वाटतंय, पण हे जाणून घ्या की आम्ही सर्वांना तुमचा आणि खेळासाठी तुम्ही केलेल्या सर्व गोष्टींचा खूप अभिमान आहे, धैर्य ठेवा.
झोया अख्तर
झोया अख्तरने इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, “चॅम्पियन! विनेश तू सोनं आहेस. तू जे काही मिळवले आहेस ते पदकांच्या पलीकडे आहे. तुझा खूप अभिमान आहे. खूप प्रेरक आहेस.”
सोनाक्षी सिन्हा
सोनाक्षी सिन्हाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले, “अविश्वसनीय! मी कल्पना करू शकत नाही की तुला आत्ता कसं वाटत असेल आणि तू चॅम्पियन होतीस, आहेस आणि नेहमीच राहशील याहून जास्त मला काय बोलावे ते कळत नाही !!!!
तापसी पन्नू
तापसी पन्नूनेही खंत व्यक्त करताना म्हटले आहे की, “हे हृदयद्रावक आहे, परंतु प्रामाणिकपणे, या महिलेने आतापर्यंत सोन्याहून अधिक नाव कमावले आहे.”
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
लग्नापूर्वी ८ वर्षे लिव्ह इन मध्ये होता विक्रांत मॅसी! म्हणाला आईनेच सांगितले होते …