Friday, September 20, 2024
Home बॉलीवूड लग्नापूर्वी ८ वर्षे लिव्ह इन मध्ये होता विक्रांत मॅसी! म्हणाला आईनेच सांगितले होते …

लग्नापूर्वी ८ वर्षे लिव्ह इन मध्ये होता विक्रांत मॅसी! म्हणाला आईनेच सांगितले होते …

अभिनेता विक्रांत मॅसी सध्या ‘फिर आयी हसीन दिलरुबा’मुळे चर्चेत आहे. तो या चित्रपटाचं सातत्याने प्रमोशन करत आहे. विक्रांत पुन्हा एकदा या चित्रपटात प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसणार आहे. आता अलीकडेच, अभिनेत्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगितले आहे. त्याच्या आईने त्याला आणि पत्नी शीतल ठाकूरला लग्नापूर्वी लिव्ह-इन करण्याचा सल्ला दिला होता. 

विक्रांतने अलीकडेच त्याच्या नातेसंबंधाबद्दल सांगितले.  “आम्ही जवळपास एक दशक एकत्र आहोत. आम्ही लग्नाआधी सुमारे आठ वर्षे डेट केले होते,” विक्रांतने अमीन जॅझसोबतच्या पॉडकास्टमध्ये हे सांगितलं.

नंतर मुलाखतीत, जेव्हा होस्टने विचारले की सेटल होण्याआधी बराच काळ डेट करणे आवश्यक आहे का, तेव्हा विक्रांत म्हणाला की हे समोरच्या व्यक्तीवर अवलंबून असतं. अभिनेता म्हणाला, “आमचे स्वभाव एकमेकांशी जुळले आणि आमची जीवनातील स्वप्नं सुद्धा सारखीच होती. आम्ही आमच्या नात्याचा जवळजवळ संपूर्ण काळच एकत्र होतो. आणि हेच माझ्या कामी आलंय.

विक्रांतने पुढे आठवण करून दिली की त्याच्या आईनेच त्याला गोष्टी अधिकृत करण्याआधी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा सल्ला दिला होता जेणेकरून ते एकमेकांसोबत राहू शकतात का ? हे पाहू शकतील, अभिनेत्याच्या आईची इच्छा होती की समोरच्या व्यक्तीला आधी चांगले ओळखावे. कारण तुम्ही एक कुटुंब सुरू करत आहात. विक्रांत म्हणाला, “माझ्या आईनेच आम्हाला एकत्र राहण्याचा सल्ला दिला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा – 

चार चित्रपट … चार हजार कोटी … दीपिकाने भल्याभल्यांना टाकलं मागे …

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा