Wednesday, January 15, 2025
Home बॉलीवूड ॲक्शन सीक्वेन्ससाठी मी टॉम अँड जेरी कडून प्रेरणा घेतो ! अक्षयने केला गमतीदार खुलासा…

ॲक्शन सीक्वेन्ससाठी मी टॉम अँड जेरी कडून प्रेरणा घेतो ! अक्षयने केला गमतीदार खुलासा…

अभिनेता अक्षय कुमार सध्या त्याच्या नवीन चित्रपटाचे प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. अक्षयचा हा या वर्षातील तिसरा चित्रपट असून यापूर्वी आलेले दोन चित्रपट मात्र बॉक्स ऑफिस वर दणकून आपटले. त्याचा नवा चित्रपट ‘खेल खेल में’ येत्या आठवड्यात प्रदर्शित होणार असून हा यावर्षीचा त्याचा तिसरा चित्रपट असेल. या चित्रपटात त्याच्यासोबत फरदीन खान, तापसी पन्नू, वाणी कपूर, एमी विर्क आणि प्रज्ञा जयस्वाल हे कलाकार दिसणार आहेत. 

अक्षय कुमारने एका मुलाखतीदरम्यान ‘टॉम अँड जेरी’ या प्रसिद्ध कार्टूनबद्दल एक आश्चर्यकारक गोष्ट सांगितली. त्याने या शोला कॉमेडी नाही तर हिंसा म्हटले आहे. अक्षयने त्याच्या सिनेमांमध्ये अनेक ॲक्शन सीक्वेन्ससाठी या कार्टूनमधून प्रेरणा घेतल्याचेही उघड केले.

अक्षय कुमार आणि त्याचा आगामी चित्रपट ‘खेल खेल में’ च्या टीमने एका मुलाखतीत संवाद साधला. अभिनेता फरदीन खानने ‘टॉम अँड जेरी’ कार्टून त्याचे आवडते कॉमेडी कार्टून असल्याचे सांगितले, त्यावर अक्षय म्हणाला, ‘नाही, नाही. टॉम अँड जेरी हि  कॉमेडी नाही तर ॲक्शन आहे. हिंसा आहे’. 

अक्षय पुढे म्हणाला, ‘मी आतापर्यंत केलेल्या ॲक्शनपैकी अनेक वेळा टॉम अँड जेरीकडून प्रेरणा घेतली आहे. हेलिकॉप्टरचे ते संपूर्ण दृश्य मी टॉम अँड जेरीमधून घेतले आहे. तो नॅशनल जिओग्राफिक या वाहिनीपासून प्रेरित असल्याचेही त्याने उघड केले. तो म्हणाला, ‘आणखी एक गोष्ट ज्यापासून मी प्रेरणा घेतली आहे. ते म्हणजे नॅशनल जिओग्राफिक, जिथे तुम्हाला सर्वोत्तम ॲक्शन पाहायला मिळते. ‘टॉम अँड जेरी’ अविश्वसनीय आहे, ज्या प्रकारची त्यांची ॲक्शन आहे ती चित्रपटांमध्ये निश्चित वापरली जाऊ शकते.

दरम्यान खेल खेल में हा चित्रपट येत्या १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शीत होणार असून हा चित्रपट अजून २ मोठ्या चित्रपटांसोबत बॉक्स ऑफिसवर भिडणार आहे. याही चित्रपटाची अक्षयच्या मागील चित्रपटांसारखीच क्रेझ अतिशय कमी आहे. श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावच्या ‘स्त्री २’ या चित्रपटाची तसेच जॉन अब्राहमच्या ‘वेदा’ या चित्रपटाची अक्षयच्या चित्रपटासोबत भिडंत होणार होती. पण स्त्री च्या निर्मात्यांनी एक दिवस आधी यायचे ठरवले. आता खेल खेल में कसे प्रदर्शन करतो हे बघावे लागेल.     

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

ज्येष्ठ पत्रकार प्रदीप बांदेकर यांचे निधन ! बॉलीवूडवर शोककळा…

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा