Sunday, September 8, 2024
Home बॉलीवूड ज्येष्ठ पत्रकार प्रदीप बांदेकर यांचे निधन ! बॉलीवूडवर शोककळा…

ज्येष्ठ पत्रकार प्रदीप बांदेकर यांचे निधन ! बॉलीवूडवर शोककळा…

ज्येष्ठ पत्रकार प्रदीप बांदेकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मुलाने, प्रथमेश बांदेकर याने या बातमीची पुष्टी केली. प्रदीप बांदेकर हे सिनेपत्रकार होते व अनेक वर्षे ते बॉलीवूडशी संलग्न होते. साहजिकच त्यांच्या निधनाने इंडस्ट्री वर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाच्या बातमीवर अनेक कलाकारांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.  

अनेक कलाकारांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर शोक व्यक्त केला आहे. अजय देवगण याने ट्वीटर वर लिहिले,  ‘प्रदीप बांदेकर जी यांचे निधन हे एक वैयक्तिक नुकसान आहे.आमच्या कुटुंबाशी त्यांचे अनेक वर्षांचे नाते आहे. ते नेहमी लक्षात राहतील.

 अभिनेत्री बिपाशा बसूने तिच्या इंस्टाग्रामवर लिहिले, ‘RIP प्रदीप जी. त्यांच्या कुटुंबाला बळ मिळो.’

अभिनेते नील नितीन मुकेश यानेही इंस्टाग्राम स्टोरीवर लिहिले, ‘प्रदीप जी तुमची आठवण येईल आमच्या आयुष्यातील काही सुंदर क्षण टिपल्याबद्दल आणि तुमच्या हास्याने आणि सकारात्मकतेने आमच्या आठवणी उजळून टाकल्याबद्दल धन्यवाद.’

प्रदीप बांदेकर यांनी आपल्या अनेक दशकांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत चित्रपट कलाकारांसोबत जवळून काम केले आहे. बॉलीवूडमधील अनेक दिग्गजांशी त्यांचे घट्ट नाते निर्माण झाले. अजय देवगणपासून मनोज बाजपेयीपर्यंत त्यांचे चित्रपटसृष्टीतील लोकांशी चांगले संबंध होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा – 

जागतिक पातळीवरच्या पुरस्काराने शाहरुख खान सन्मानित ! ठरला पहिला भारतीय अभिनेता…

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा