Saturday, October 19, 2024
Home बॉलीवूड या रक्षाबंधनाच्या दिवशी बघा भावा-बहिणीच्या नात्यावर आधारित हे चित्रपट…

या रक्षाबंधनाच्या दिवशी बघा भावा-बहिणीच्या नात्यावर आधारित हे चित्रपट…

रक्षाबंधनाच्या सणाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. यंदा १९ ऑगस्टला रक्षाबंधन साजरे केले जाणार आहे. रक्षाबंधनाचा सण भाऊ-बहिणीचे नाते अधिक दृढ करतो. बॉलीवूडमध्येही असे अनेक चित्रपट आहेत, ज्यात भावा बहिणीचं घट्ट नातं दाखवण्यात आलं आहे. या चित्रपटांमध्ये भाऊ-बहिणीतील एक मजबूत आणि अनोखा बंध पाहायला मिळतो. त्यामुळे या रक्षाबंधनाला तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासह या चित्रपटांचा आनंद घ्या.

रक्षाबंधन

बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या रक्षाबंधन या चित्रपटात भाऊ आणि बहिणीचे घट्ट नाते दिसते. या चित्रपटाची कथा भावनिक आहे. या चित्रपटात भावाची भूमिका साकारणारा अक्षय कुमार आपल्या बहिणींच्या लग्नासाठी खूप मेहनत करतो. हुंड्याची वाईट प्रथाही चित्रपटात दाखवण्यात आली आहे. त्याच्या एका बहिणीचा या दुष्ट प्रथेमुळे कसा मृत्यू होतो. 

हम साथ साथ है 

दिग्दर्शक सूरज बडजात्या यांचा ‘हम साथ-साथ है’ हा फॅमिली ड्रामा चित्रपट आहे. यामध्ये सलमान खान, सैफ अली खान आणि मोहनीश बहल या तीन भावांच्या मजबूत नात्याची कहाणी पाहायला मिळाली आहे. नीलम कोठारी यांनी त्यांच्या बहिणीची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट आजही प्रेक्षकांना खूप आवडतो. यात तब्बू, करिश्मा कपूर आणि सोनाली बेंद्रे महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत.

दिल धडकने दो 

या यादीत रणवीर सिंग आणि प्रियांका चोप्रा स्टारर चित्रपट ‘दिल धडकने दो’चाही समावेश आहे. या चित्रपटात प्रियांका आणि रणवीरने भाऊ आणि बहिणीची भूमिका साकारली होती. दोघांमध्ये खूप छान बाँडिंग पाहायला मिळत आहे. विक्रांत मॅसी, राहुल बोस, अनिल कपूर, अनुष्का शर्मा, फरहान अख्तर, शेफाली शाह असे अनेक स्टार्स दिसले आहेत.

सरबजीत

अभिनेता रणदीप हुड्डा आणि ऐश्वर्या राय यांचा ‘सरबजीत’ चित्रपटात भाऊ-बहिणीचे मजबूत नाते दाखवण्यात आले आहे. चित्रपटात सरबजीतची भूमिका करणाऱ्या रणदीपला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली असते. त्यामुळे त्याची बहीण त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात आपले संपूर्ण आयुष्य देते. हा चित्रपट बायोपिक आहे. चित्रपटाची कथा खूप भावनिक आहे. 

इक्बाल

भाऊ-बहिणीच्या नात्यावर आधारित चित्रपटांमध्ये अभिनेता श्रेयस तळपदे स्टारर इक्बाल या चित्रपटाचे नाव देखील घ्यायलाच हवे. श्रेयस तळपदे आणि श्वेता बसू यांनी या चित्रपटात भाऊ आणि बहिणीची भूमिका साकारली होती. यामध्ये एक बहीण आपल्या भावाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य देते. या चित्रपटाची कथा प्रेक्षकांना खूप आवडली होती. 

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

मी कल्की पाहिला, जो मला आवडला नाही. चित्रपटात प्रभास एखाद्या जोकरसारखा होता… अर्षद वारसीने चित्रपटावर केली टीका

 

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा