Sunday, September 8, 2024
Home बॉलीवूड मी कल्की पाहिला, जो मला आवडला नाही. चित्रपटात प्रभास एखाद्या जोकरसारखा होता… अर्षद वारसीने चित्रपटावर केली टीका

मी कल्की पाहिला, जो मला आवडला नाही. चित्रपटात प्रभास एखाद्या जोकरसारखा होता… अर्षद वारसीने चित्रपटावर केली टीका

नाग अश्विन दिग्दर्शित ‘कल्की 2898 एडी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरला होता. या चित्रपटाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर १,००० कोटींहून अधिक कमाई केली. या चित्रपटाने अनेक विक्रम मोडले. एकट्या हिंदी आवृत्तीनेही चांगली कमाई केली होती. मात्र आता अभिनेता अर्शद वारसीने अलीकडेच निर्मात्यांना प्रभासला योग्य प्रकारे सादर न केल्याबद्दल निंदा केली आहे आणि चित्रपटावर टीकाही केली आहे.

नाग अश्विन दिग्दर्शित हा साय-फाय डिस्टोपियन चित्रपट २७ जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. रिलीज झाल्यावर, चित्रपटाला बहुतेक सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि बहुसंख्य प्रेक्षकांनी चित्रपटाचे कौतुक केले. अश्विनच्या दूरदृष्टीला प्रेक्षकांनी दाद दिली. अगदी परफॉर्मन्स आणि तांत्रिक गोष्टींनाही प्रेक्षकांनी दाद दिली. मात्र, अर्शद वारसी या चित्रपटाबद्दल फारसा खूश दिसत नाहीये .

समदीश भाटियाच्या YouTube चॅनलवर नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अर्शद वारसीला विचारण्यात आले की त्याने शेवटचा कोणता चित्रपट थिएटरमध्ये पाहिला होता. अभिनेत्याने खुलासा केला की त्याने ‘कल्की 2898 एडी’ पाहिला आणि तो म्हणाला की मला हा चित्रपट आवडला नाही कारण मला मॅड मॅक्स सारख्या मोठ्या चित्रपटाची अपेक्षा होती.

त्याने अगदी स्पष्टपणे सांगितले की, मॅग्नम ओपसमध्ये प्रभासला जोकर सारखं सादर करण्यात आलं आहे. अर्शद वारसी म्हणाला, ‘मी कल्की पाहिला होता, जो मला आवडला नाही. चित्रपटात प्रभास एखाद्या जोकरसारखा होता. मला मॅड मॅक्स बघायचा आहे, यार, त्यांनी हे काय बनवले. ते असे का करतात, मला समजत नाही.

दरम्यान,अर्शद वारसी पुढे ‘वेलकम टू द जंगल’ आणि ‘जॉली एलएलबी 3’ मध्ये दिसणार आहे. विशेष म्हणजे या दोन्ही चित्रपटांमध्ये अक्षय कुमार त्याचा सहकलाकार आहे आणि या दोन्ही अनुभवी कलाकारांकडून चित्रपटाची मोठी कमाई होण्याची अपेक्षा आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

सातारचे कविवर्य अभिजित बिचुकलेंची होणार बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री; मनोरंजनाचा डोस वाढणार…

 

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा