बिग बॉस मध्ये धुमाकूळ घालणारा गुलीगत सुरज चव्हाण आता मराठी सिनेमात दिसणार आहे. सुरज चव्हाणची सध्या सगळीकडे चर्चा आहे. बिग बॉस मधील त्याच्या कामगिरीने त्याने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. सोशल मिडीयावर सुरजला सगळीकडून प्रेक्षकांचा पाठींबा मिळत आहे. बिग बॉस पूर्वी सुरज टिक टॉक वर प्रचंड फेमस होता. तिथे त्याने लाखो फोलोवर्स मिळवले होते. त्यानंतर सुरजने इन्स्टाग्राम सुद्धा गाजवले. बिग बॉस नंतर त्याची प्रसिद्धी अगदी शिखरावर गेली.
आता सुरज एका मराठी सिनेमात झळकणार आहे. या मराठी सिनेमाचे नाव ‘राजाराणी’ असे आहे. या सिनेमातून सुरज आता मोठा पडदा सुद्धा गाजवायला सज्ज झाला आहे. या सिनेमाची कथा एका सत्य घटनेवर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. या चित्रपटात मुख्य कलाकाराच्या मित्राच्या भूमिकेत सुरज झळकणार आहे. या भूमिकेत त्याला बघणे फारच रंजक ठरणार आहे.
रोहन पाटील आणि वैष्णवी शिंदे हे या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. येत्या १८ ऑक्टोबर २०२४ ला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. शिवाजी दोलताडे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. दरम्यान सुरजने बिग बॉसचे घर मात्र गाजवले आहे, त्याचे अनेक संवाद सगळीकडे फेमस होत आहेत. शिवाय नुकतेच अक्षय कुमारने सुद्धा त्याची नक्कल केली होती. सूरजचा पुढचा प्रवास कसा असेल हे बघणे रंजक ठरेल.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –