कलर्स मराठी वरील बिग बॉस मराठीचा पाचव्या सीझनचा चौथा आठवडा सुरू आहे. नुकतेच घरात, नॉमिनेशन कार्य व कॅप्टनचे कार्य पार पडले. यात अरबाजने घरातल्या सर्व सदस्यांसाठी आपल्या कॅप्टनसीचा अधिकार सोडला. त्याच्या या निर्णयाने दोन लाखाची बीबी करन्सी संपूर्ण घराला मिळाली. तसेच, मिळालेल्या पॉवर कार्डचा उपयोग करून त्याने निक्कीला घराचा कॅप्टन बनवले.
कॅप्टन बनल्यामुळे निकी या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेपासून सुरक्षित असणार आहे. कलर्स मराठी कडून नुकताच प्रोमो शेअर करण्यात आला आहे. त्यात, निक्की आणि वैभवमध्ये वादाची ठिणगी पडली असल्याचं दिसतात.
झालं असं की , निक्की अरबाज व वैभव तिघेही गार्डन एरियामध्ये बसलेले दिसत आहेत. त्यावेळी निक्की मोठ्या आवाजात इरिनाला म्हणते की, ” बरं झालं नॉमिनेट झालीस. आधीपासून तू आमच्या ग्रुपमध्ये नव्हतीस, तू आत्ताच ग्रुपमध्ये ऍड झाली आहेस.” निकीचे हे बोलणे ऐकून वैभव चा पारा चांगलाच वाढलेला दिसून येतो. त्यावर वैभव निक्की ला म्हणतो , ” निक्की हे तुझ जास्त होतय आता… तुझं काहीतरी फालतू ऐकून घेणार नाही मी…. त्यावर त्याला प्रत्युत्तर म्हणून निक्की म्हणते, “मी तुला बोलले नाहीये इरेनाला बोलली…. तू कानात बोट घाल…” त्यावर वैभव म्हणतो की , “तुझ्याकडे बोट आहेत ना ते तू तोंडात घाल…” शेवटी निक्की वैभवला म्हणते की, “ती तुला घरातून घेऊन नाही आली माझा PA म्हणून.” असं म्हणत ती टेबलवरच्या प्लेट्सना लाथा मारून खाली फेकते…. या झालेल्या प्रकारामुळे टीम ए मध्ये काही फरक पडतो का हे पाहणे मनोरंजक असणार आहे.
या आठवड्यातील घराबाहेर जाणारे सदस्य : अभिजीत सावंत , वैभव चव्हाण , इरिना व आर्या
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
अंकिताने नवऱ्यासमोर ठेवली होती ही अट, मान्य असेल तरच करेन लग्न !
पश्चिम बंगालच्या राजकीय परिस्थितीवर बोलले विवेक अग्निहोत्री; लैंगिक हिंसाचारामुळे समाज आणि कुटुंबांचे मनोधैर्य खच्ची होते …