Sunday, September 8, 2024
Home टेलिव्हिजन अंकिताने नवऱ्यासमोर ठेवली होती ही अट, मान्य असेल तरच करेन लग्न !

अंकिताने नवऱ्यासमोर ठेवली होती ही अट, मान्य असेल तरच करेन लग्न !

बिग बॉस मराठी सिझन ५ ची वादग्रस्त सदस्य असलेली अंकिता प्रभू वालावलकर कायमच चर्चेत असते. सोशल मिडीयावर देखील ती खूप सक्रीय असते. कोकण कन्या म्हणून ती विशेष प्रसिद्ध आहे. सोशल मिडीयावर तिचे लाखो फोलोवर्स आहेत.बिग बॉसच्या घरात तिने कॅप्टन होण्याचा बहुमान देखील मिळवला घरात योगिता चव्हाण सोबत बोलताना तिने एक खास किस्सा सांगितला आहे.

यात तिने तिच्या होणाऱ्या नवऱ्यासमोर लग्नासाठी एक अट ठेवली होती. अंकिताच्या घरी आधी पासून गणपती बसतो. ती लहान असताना घरात कुणीही मुलगा नसल्याने तिच्या आई बाबांना आणि आजीला काळजी पडली होती कि नंतर गणपती कोण बसवणार. त्याच वेळी गणपतीचं सगळं मीच करेल असा तिने विचार केला. त्यामुळेच पुढे जेव्हा अन्कीताने बॉयफ्रेंडला जेव्हा लग्नासाठी होकार दिला तेव्हा तिने गणपती बसवण्याची हि अट घातली. अंकिताच्या होणाऱ्या नवऱ्याच्या घरी ७ दिवसांचा गणपती असतो आणि तिच्या घरी सुद्धा. 

बॉयफ्रेंडने तिला आधी ९ दिवसांचा गणपती ठेवण्याचा सल्ला दिला होता, पण अंकिताला तो सल्ला मान्य नव्हता. यावर अंकिताने तिच्या आईच्या मदतीने यातील सुवर्णमध्य काढला. ज्यातून तिला दोन्ही घरच्या गणपतींना वेळ देता येईल. अंकिताच्या आईने यात तिची मदत केली आणि तिच्या नवऱ्याने देखील तिच्या या निर्णयाचा मान राखला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

वर्षा ताईंमुळे संपणार अरबाझ आणि निक्की यांच्यातला दुरावा…

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा