Wednesday, January 15, 2025
Home बॉलीवूड शबाना आझमींनी महिलांच्या सुरक्षेवर व्यक्त केली चिंता; म्हणाल्या, ‘पितृसत्ताक मानसिकता संपवण्याची गरज आहे’

शबाना आझमींनी महिलांच्या सुरक्षेवर व्यक्त केली चिंता; म्हणाल्या, ‘पितृसत्ताक मानसिकता संपवण्याची गरज आहे’

कोलकात्यात प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याच्या घटनेने देश हादरला आहे. तसेच पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अलीकडेच अभिनेत्री शबाना आझमीही (Shabana Azami) यावर चिंता व्यक्त करताना दिसली. कोलकात्यातील बलात्कार आणि हत्येची ही घटना लज्जास्पद असल्याचे त्यांनी वर्णन केले आणि निर्भयाच्या घटनेनंतर परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नसल्याचे सांगितले. महिलांच्या सुरक्षिततेसाठी पुरुषप्रधान मानसिकता संपवण्याची गरज असल्याचे मत या ज्येष्ठ अभिनेत्रीने व्यक्त केले.

युनायटेड नेशन्स चिल्ड्रेन्स फंड (युनिसेफ) च्या सहकार्याने पुण्यातील ग्रॅविटास फाउंडेशनने आयोजित केलेल्या ‘बिल्डिंग अ सेफ वर्ल्ड फॉर चिल्ड्रन’ या विषयावरील गोलमेज परिषदेला शबाना आझमी बुधवारी संध्याकाळी उपस्थित होत्या. येथे त्यांना कोलकाता येथील एका डॉक्टरचा बलात्कार आणि खून तसेच बदलापूर, महाराष्ट्रातील एका शाळेत विद्यार्थिनींच्या कथित लैंगिक अत्याचाराबद्दल विचारण्यात आले.

अभिनेत्री म्हणाली, “अशा घटनांविरोधात राग असायला हवा, आजच नाही तर हा राग खूप पूर्वी व्हायला हवा होता. आणि ते केवळ एका प्रकरणात राजकीय आहे म्हणून निवडक नसावे… या सर्व घटना अत्यंत धोकादायक आहेत.” अभिनेत्री पुढे म्हणाली, “जर आपण या घटनांकडे निवडकपणे पाहत राहिलो तर आपण मुळापर्यंत पोहोचू शकणार नाही. हे सर्व अत्यंत लज्जास्पद आहे.”

लोकांची पितृसत्ताक मानसिकता संपवण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी व्यक्त केले. 2012 च्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर लैंगिक छळाच्या घटनांमध्ये कोणतीही घट झाली नसल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा – 

एमर्जन्सी चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सुरु; कंगना रणौतचे फोटो व्हायरल
नवऱ्यापासून विभक्त झाल्यावर मानसीचा जलवा; फोटो पाहून तुम्हीही म्हणाल, ‘जय जिजाऊ जय शिवाय’

हे देखील वाचा