बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ कंगना रणौत कायमच तिच्या बोलण्यामुळे चर्चेचा विषय असते. ती कायम रोखठोक मत व्यक्त करत असते. सतत कोणालातरी निशाणा साधताना ती दिसते. बऱ्याचदा तिच्या बोलण्यामुळे ती ट्रोल झाली आहे, परंतु तरीपण ती कायम बेफिकीर बोलताना दिसते. कंगनाच्या विरोधात पश्चिम बंगालच्या उल्टाडांगामध्ये एफआयआर दाखल करण्यात आली आहे. कंगना रणौत हिच्यावर पश्चिम बंगालमध्ये दंगल भडकवल्याचा आरोप करण्यात आला आहे.
टीएमसी (तृणमूल कॉंग्रेस) नेता ऋजू दत्ता यांनी दाखल केलेल्या, एफआयआरमध्ये म्हटले आहे की, कंगना रणौतने पश्चिम बंगालमध्ये द्वेषपूर्ण प्रचार घडविण्याचा प्रयत्न केला आहे.
दंगल भडकवल्याचा आरोप
ऋजू यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत, त्यांनी अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटला एक लिंक दिली आहे. त्यात त्यांनी असे लिहिले आहे की, कंगना रणौत हिने आपल्या व्हेरिफाईड इंस्टाग्राम अकाउंटवरून, स्टोरी सेक्शनमध्ये दाखविलेल्या बर्याच आक्षेपार्ह पोस्ट्स केल्या आहेत. ऋजू यांनी सांगितले की, कंगनाने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, यांची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला, आणि त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
ट्विटर अकाउंट निलंबित
या संदर्भात कंगना रणौत हिचे ट्विटर अकाउंट नुकतेच निलंबित करण्यात आले होते. एकामागून एक, ती बऱ्याच काळापासून भडका उडेल असे ट्वीट करत होती. त्यानंतर ट्विटरने तिचे अकाउंट कायमचे निलंबित केले आहे. ट्विटर हँडलवरून निलंबित झाल्यानंतर, कंगना रणौत आता भारतीय मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म कु वापरत आहे.
कंगना रणौत हिच्याविरोधात एफआयआर दाखलमध्ये, ऋजू यांनी ती छायाचित्रे आणि स्क्रीनशॉट पोलिस ठाण्यात सादर केली आहेत, जी कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट केली होती. वृत्तानुसार, बंगाल निवडणुकांच्या वेळी कंगना उघडपणे भाजपाला पाठिंबा देत होती, आणि ममता बॅनर्जी यांच्याविरोधात प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न केला होता. कंगना तिच्या चित्रपटात तर कमाल करतेच, पण दरवेळी भडका उडेल असे काही बोलून ती ट्रोल होत असते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-कोरोनामधून बरी झाल्यानंतर पाहा काय म्हणतेय ‘शालू’, फेसबुकवर शेअर केली खास पोस्ट!