Thursday, June 13, 2024

जगावेगळं! बिझनेसमॅनच्या अंत्यसंस्कारात रडण्यासाठी चंकी पांडेंना मिळाली होती ५ लाखांची ऑफर, कारण वाचून बसेल शॉक

मोठ- मोठ्या कार्यक्रमांमध्ये आणि बिझनेसमॅनच्या मुलांच्या लग्नात कलाकार परफॉर्मन्स करताना पाहायला मिळतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का, या आनंदाच्या कार्यक्रमांव्यतिरिक्त शोकसभेलाही कलाकारांना बोलावले जाते. हे वाचून तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल, परंतु हे खरंय. यासाठी त्यांना भली मोठी रक्कमही दिली जाते. असेच काहीसे बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेसोबत घडले होते. त्याला यासाठी लाखो रुपये दिले गेले होते. याचा खुलासा स्वत: अभिनेत्याने एका मुलाखतीत केला होता.

खरं तर हे आमंत्रण कोणत्याही आनंदोत्सवाचे नाही, तर शोकसभेचे होते. यामध्ये चंकी पांडे यांना एका बिझनेसमॅनच्या अंत्यसंस्कारामध्ये रडायचे होते. यासाठी त्यांना मोठी रक्कम दिली होती. त्यांनी एखा मुलाखतीत सांगितले होते की, सन २००९ मध्ये मुलुंडच्या एका मोठ्या बिझनेस फॅमिलीने त्यांना विनंती केली होती की, त्यांनी त्यांच्या वारसाच्या अंत्यसंस्कारात भाग घ्यावा. जेणेकरून ते आपल्या पाहुण्यांवर असा प्रभाव टाकू शकतील की, बिझनेसमॅनने चित्रपटांमध्येही गुंतवणूक केली आहे आणि त्यामुळे ते काही थकबाकी देऊ शकणार नाहीत.

चंकी यांनी सांगितले की, “मी त्या अंत्यसंस्कारात रडावे आणि त्यादरम्यान एका कोपऱ्यात उभा राहू, असे त्यांना वाटत होते. तेव्हाच मी ही ऑफर नाकारली होती. परंतु कुटुंबाची परिस्थिती पाहून मी माझ्या बदल्यात दुसऱ्या एका व्यक्तीला पाठवले होते.” यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, “मी हे सांंगू शकत नाही की, माझ्या जागी कोण गेले होते. परंतु ५ लाख रुपये एका जागी मूर्ती बणून उभे राहण्यासाठी छोटी रक्कम नव्हती.”

चंकी पांडे यांच्या कारकिर्दीविषयी बोलायचे झाले, तर त्यांनी सन १९८७ साली आलेल्या ‘आग ही आग’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्यांच्यासोबत धर्मेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा मुख्य भूमिकेत होते. यानंतर त्यांनी नव्वदच्या दशकात अनेक चित्रपटांत काम केले होते. त्यात ‘तेजाब’, ‘खतरों के खिलाडी’, ‘मिट्टी और सोना’ यांसारख्या अनेक चित्रपटांचा समावेश होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

अक्षय, सलमान यांच्यामुळे चंकी पांडे यांना मिळाले नाही काम?, स्वतःच केला खुलासा
एका पायजम्यामुळे चंकी पांडेला मिळाली होती चित्रपटात काम करण्याची सुवर्णसंधी, वाचा तो रंजक किस्सा

हे देखील वाचा