मॅगी हा सगळ्यांच्या अत्यंत जवळचा पदार्थ आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने मॅगी खात असतात. सगळ्यांकडे भूक लागल्यावर, पहिला पर्याय म्हणून मॅगीची निवड होत असते. पण सनीच्या बाबतीत जरा वेगळं आहे. सनी लिओनीने नुकतेच इंस्टाग्रामवर एक मजेदार पोस्ट शेअर केली आहे. यात तिने खाण्याशी संबंधित बोलतानाचा व्हिडिओ तिने शेअर केला आहे, ज्यामध्ये ती मॅगीचा सुगंध घेत असताना बसलेली दिसत आहे. सनी लोभी मुलासारखी मॅगीजवळ बसली आहे, परंतु मॅगीला ती खाऊ शकत नाही. यामागील कारणही तिने स्पष्ट केले आहे.
सनी लिओनीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, मॅगीची वाटी दिसली आहे. सनी मॅगीकडे पाहत मॅगीचा वास घेत आहे. व्हिडिओच्या बॅकग्राऊंजला महिलेचा आवाज ऐकू येतो. जी बोलत आहे की, डायटिंग केल्यानंतरचा प्रभाव, केवळ मॅगीचा सुगंध घेऊ शकतो, खाऊ शकत नाही.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
सनीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे. ‘जेव्हा आपण डायटिंगवर असता, आणि मॅगी खाण्याची खुप इच्छा होत असते.’ सनी खरोखर मॅगी न खाता मॅगीचा सुगंध घेऊन तिथून उठते.
दुसर्या व्हिडिओमध्ये सनी आनंदाने नाचताना दिसत आहे. हे असे लिहिलेले आहे, जेव्हा आई तोंडलीऐवजी पनीर बनवते. इंस्टाग्रामवर सनी लिओनीचे ४५.४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत.
ती तिच्या चाहत्यांसाठी मजेदार पोस्ट करत असते. तिच्या इंस्टा पोस्टमध्ये तिचा नवरा, आणि मुलांनाही ती सतत दाखवत असते. काही दिवसापूर्वीच तिने एक इंग्लिश गाण्याचा व्हिडीओ शेयर केला होता, त्यावर चाहत्यांच्या कंमेंटचा पाऊस पडला होता. थोडक्यात काय सनी तिच्या चाहत्यांचे, कोरोनामुळे खूप मनोरंजन करत आहे. सनीने अंधेरीमध्ये १२व्या मजल्यावर घर घेतले आहे. याची किंमत १६ कोटी रुपये सांगितली जात आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘कोरोनाने लहान- मोठे भेद मिटवून टाकले आहेत..’, म्हणत क्रिती सेनन कोरोनाच्या परिस्थितीवर झाली व्यक्त