‘कोरोनाने लहान- मोठे भेद मिटवून टाकले आहेत..’, म्हणत क्रिती सेनन कोरोनाच्या परिस्थितीवर झाली व्यक्त

Kriti sanon first emotional video on corona after completing bhediya shoot first watch here


अभिनेत्री क्रिती सेननने नुकतेच ‘भेडिया’ या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. हे शूटिंग संपल्यानंतर, तिने तिची पहिली पोस्ट इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने कोरोनाच्या भयावह परिस्थितीवर आपले मत मांडले आहे.

क्रिती या व्हिडिओमध्ये तिच्या मनातल्या भावना शेअर करत चाहत्यांना म्हणाली की, “जेव्हा मी माझ्या आजूबाजूला पाहते तेव्हा, असे वाटते की कोरोनाने आता देशाची परिस्थिती कशी बदलली आहे. या साथीच्या आजाराने लहान- मोठ्यातील भेद मिटवून टाकले आहेत. प्रत्येकजण एक प्रकारे असहाय्य दिसत आहे, मग तो कोणत्याही प्रांताचा असो. कोणीही असो, कसाही असो, जर तो किंवा त्याच्या कुटुंबातील कोणी या आजाराच्या तावडीत आले असतील, तर त्याची परिस्थिती दयनीय दिसू लागते. समजत नाही कधी त्याच्यासोबत काय होईल.”

क्रिती सेनन सातत्याने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर स्टोरीमध्ये मदत पोस्ट करत राहते. आपल्या स्टोरीद्वारे, कोणाला ऑक्सिजन किंवा बेडची गरज असेल किंवा कुठे प्लाझ्मा उपलब्ध असेल, अशी माहिती अभिनेत्री देत राहते.

‘भेडिया’चे शूटिंग पूर्ण-
क्रितीने अलीकडेच तिच्या ‘भेडिया’ चित्रपटाचे शूट पूर्ण केले आहे. हे शूटिंग अरुणाचल प्रदेशात झाले. या चित्रपटात, तिच्यासोबत वरुण धवन मुख्य भूमिकेत आहे, ज्याच्यासोबत तिने सेटवर बरीच मस्ती केली. तिने मस्तीचे काही व्हिडिओही तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

दिल्लीतील रहिवासी असलेल्या क्रितीने २०१४ मध्ये ‘हिरोपंती’ या चित्रपटाद्वारे टायगर श्रॉफसोबत हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला होता. त्यानंतर तिने आयुषमान खुराना, सुशांत सिंग राजपूत, शाहरुख खान आणि वरुण धवन यांच्यासोबत बरेच चित्रपट केले. आज ती टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे.

क्रिती सेननच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती अक्षय कुमारसोबत ‘बच्चन पांडे’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. तसेच, सुपरस्टार प्रभाससोबत क्रिती ‘आदिपुरुष’ या चित्रपटात सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दिशा परमार का थांबवतेय राहुल वैद्यला? त्याला पट्ट्याने बांधून तिने केलं ‘असं’ काही, एकदा पाहाच

-‘सर्व पाकिस्तानी तुमच्यासोबत आहोत’, कोरोनाशी झुंज देणाऱ्या भारतासाठी अभिनेता अली जफरची प्रार्थना, व्हिडिओ व्हायरल

-बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी रणबीर कपूरने केले होते ऑस्कर नॉमिनेटेड शॉर्ट फिल्ममध्ये काम, पाहा व्हिडिओ


Leave A Reply

Your email address will not be published.