Monday, February 24, 2025
Home बॉलीवूड ‘धाकड गर्ल’ने पुन्हा साधला ममता बॅनर्जींवर निशाणा! म्हणाली, ‘मी तुम्हाला घाबरत नाही’

‘धाकड गर्ल’ने पुन्हा साधला ममता बॅनर्जींवर निशाणा! म्हणाली, ‘मी तुम्हाला घाबरत नाही’

तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते ऋजु दत्ता यांनी, द्वेषयुक्त भाषण केल्याबद्दल ‘धाकड गर्ल’ कंगना रणौतविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यांनी कंगनावर बंगालमध्ये जातीय हिंसा भडकवण्याचा आणि ममता बॅनर्जींच्या प्रतिमेला कलंक लावल्याचा आरोप केला आहे.

ऋजु दत्ता त्यांच्या तक्रारीवर आता कंगनाची प्रतिक्रिया समोर आली आहे. या एफआयआरला ती घाबरत नाही, असे कंगना म्हणाली आहे. याशिवाय कंगनाने पुन्हा स्वतः ममता बॅनर्जी यांच्याविरोधात असल्याचे सांगितले आहे.

काय म्हणाली कंगना
कंगना रणौत म्हणाली, “मजेची बाब म्हणजे, ममता बॅनर्जी अशा लोकांची उघडपणे हत्या करत आहेत, ज्यांनी त्यांना मत दिले नाहीत. त्या माझ्यावर जातीय हिंसाचाराचा आरोप करत आहेत. ममता बॅनर्जी, ही तुमच्या अंताची सुरुवात आहे. संपूर्ण देश पाहत आहे की, तुमचे हात निरपराध लोकांच्या रक्ताने माखले आहेत. तुम्ही मला घाबरवू शकत नाही किंवा एफआयआरद्वारे माझा आवाज थांबवू शकत नाही.”

ऋजु दत्ता तक्रारीत काय म्हणाले
ऋजु यांनीही आपल्या एफआयआरची एक प्रत ट्विटरवर शेअर केली आहे. ही प्रत शेअर करण्यासोबतच त्यांनी लिहिले की, “मी कंगना रणौत यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केली आहे. कारण त्या बंगालमध्ये जातीय हिंसा भडकवण्यासाठी द्वेष पसरवत आहे आणि त्याचवेळी ममता बॅनर्जी यांची प्रतिमा देखील खराब करत आहेत.”

काही दिवसांपूर्वी निलंबित झालंय अकाउंट
काही दिवसांपूर्वीच कंगनाचे ट्विटर अकाऊंट निलंबित करण्यात आले आहे. तिचे अकाऊंट काही दिवसांसाठी नव्हे, तर कायमचे निलंबित केले गेले आहे. याचे कारण म्हणजे, तिने सातत्याने ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. अलीकडेच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांचे सरकार स्थापन झाले आहे. ज्यानंतर कंगनाने टीएमसीविरोधात अनेक वादग्रस्त ट्वीट केले. ज्यामुळे तिचे अकाऊंट निलंबित केले गेले आहे.

कंगनाचे ट्विटर अकाऊंट निलंबित झाल्यानंतर, तिचे चाहते खूप निराश झाले आहेत. ते आपला राग सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत. त्याचसोबत काही लोक कंगनाचे अकाऊंट निलंबित झाल्यामुळे खूप खुश आहेत. याशिवाय, कंगनाची बहीण रंगोलीचेही अकाऊंट निलंबित केले गेले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘पंगा क्वीन’ कंगना रणौत विरोधात एफआयआर दाखल, पाहा काय घातलाय राडा?

-कोरोनामधून बरी झाल्यानंतर पाहा काय म्हणतेय ‘शालू’, फेसबुकवर शेअर केली खास पोस्ट!

-कोरोनाविरुद्धच्या लढाईत विराट कोहली आणि अनुष्का शर्माची उडी, आपल्या मोहिमेत सहभागी होण्याचे चाहत्यांना केले आवाहन

-जगावेगळं! बिझनेसमॅनच्या अंत्यसंस्कारात रडण्यासाठी चंकी पांडेंना मिळाली होती ५ लाखांची ऑफर, कारण वाचून बसेल शॉक

हे देखील वाचा