विजय सेतुपतीचा (Vijay Setupati) तामिळ चित्रपट ‘महाराजा’ चीनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही या चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. अनुराग कश्यप, अभिरामी आणि ममता मोहनदास सारख्या अभिनेत्यांनी अभिनय केलेल्या या चित्रपटाचे भारतातील समीक्षकांनीही कौतुक केले. आता हा चित्रपट चीनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड बनवत आहे.
२९ नोव्हेंबरला ‘महाराजा’ चीनी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. तो 40 हजार स्क्रीनवर प्रदर्शित झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने प्रीमियर स्क्रिनिंग दरम्यान 5.40 कोटी रुपये कमावले, त्यानंतर पहिल्या दिवशी 4.60 कोटी रुपयांचे कलेक्शन झाले. दुसऱ्या दिवशी कलेक्शन वाढले आणि 9.30 कोटी रुपयांची भर पडली. दोन दिवसांत एकूण 19.30 कोटी रुपयांच्या कलेक्शनसह, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तमिळ चित्रपटांमध्ये या चित्रपटाने स्वतःला एक मजबूत दावेदार म्हणून स्थापित केले. त्याचप्रमाणे सातव्या दिवशीही या चित्रपटाची कामगिरी दमदार राहिली आणि ३.९० कोटींचा व्यवसाय केला. आत्तापर्यंत महाराजांनी चीनमध्ये एकूण 40.75 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे.
यासह नोव्हेंबर 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ चित्रपटानंतर महाराजा हा चीनमध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. रिपोर्ट्सनुसार, हा आता चीनी बाजारात सर्वाधिक कमाई करणारा 13वा भारतीय चित्रपट बनला आहे.
‘महाराजा’ च्या बजेटबद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट 20 कोटींच्या बजेटमध्ये बनला आहे. चीनमध्ये रिलीज होण्यापूर्वीच ‘महाराजा’ वर्षभरातील सर्वात मोठ्या तमिळ हिट चित्रपटांपैकी एक ठरला होता, ज्याने जगभरात रु. 125.38 कोटी कमावले होते.
त्याच्या चमकदार कामगिरीनंतर, महाराजा आता चीनमध्ये यशस्वी झालेल्या काही भारतीय चित्रपटांमध्ये सामील झाला आहे. या यादीमध्ये ‘3 इडियट्स’, ‘दंगल’, ‘सिक्रेट सुपरस्टार’, ‘हिंदी मीडियम’ आणि ‘बाहुबली 2’ यांचा समावेश आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
लाल सिंग चढ्ढा सारखे सिनेमे चालायला हवेत; शबाना आझमींना झाले फ्लॉपचे दुःख…
राजामौलीच्या ऑस्कर विजेत्या चित्रपटावर बनवणार डॉक्युमेंट्री, ‘RRR- बिहाइंड अँड बियॉन्ड’ या दिवशी होणार प्रदर्शित