मराठीमधील ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे (Sharad Ponkshe) हे नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. कोणतेही बेधडक वक्तव्य करताना ते अजिबात कोणालाही न घाबरता त्यांचे मत ठळकपणे मांडत असतात. अशातच शरद पोंक्षे यांनी कल्याण मधील अत्रे रंग मंदिराच्या दूर अवस्थेबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केलेली आहे. रविवारी एका कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तिथे येणार असल्याने VVIP पक्षाची देखील रंगरंगोटी केली जात आहे. परंतु त्या नाट्यगृहातील अनेक खुर्च्या तुटलेल्या आहेत. काही बल्बबंद आहेत. त्याचप्रमाणे डोंबिवली सावित्रीबाई फुले नाट्यगृहाची देखील हीच अवस्था झालेली आहे. याबाबत प्रशासनाला देखील सांगण्यात आले होते. परंतु त्यांच्याकडून याबद्दल कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. याबद्दल शरद पोंक्षे यांनी खंत व्यक्त केलेली आहे. आणि सध्या त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
अत्रे रंग मंदिरात शनिवारी पुरुष नाटकाचा प्रयोग होता. या प्रयोगाच्या आधी ते मेकअप रूम मध्ये गेले. तेव्हा त्या ठिकाणी एक कामगार रंग रंगोटी करत होत. त्याला शरद पोंक्षे यांनी नाट्यप्रयोग असलेले सांगितल्यावर तो निघून गेला. याबाबत बोलताना शरद पोंक्षे म्हणाले की, “अत्रे रंगमंदिरात प्रेक्षक तिकीट काढून जातात.या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला नाटक पाहण्यासाठी येतात. पण त्यांच्यासाठी बाहेर बसण्याची व्यवस्था नाही. रंग मंदिरातील पुढच्या खुर्च्या तुटलेल्या आहेत. रविवारी मुख्यमंत्री येणार असल्याने ही माहिती करण्यात येते. मुख्यमंत्री आल्यावर त्यांना वाटते की नाट्यगृह छान आहे . मात्र गृहमंत्री सांस्कृतिक मंत्री आणि अन्य खात्याचे मंत्री यांनी अचानक रंग मंदिरांना भेट देऊन पाहणी करावी.”
पुढे शरद पोंक्षे म्हणाले की, “नाट्यगृहांना आचार्य अत्रे सावित्रीबाई फुले यांचे नाव दिले आहे. त्यांच्या कार्याविषयी भाषणात बोलतो. त्यांची जयंती पुण्यतिथी आपण उत्साहाने साजरी करतो. पण थोऱ्या मोठ्यांची नावं दिलेली रंगमंदिरे नीट ठेवू शकत नसाल, तर त्यांच्या नावे देऊन त्यांच्या नावाला काळिंबा तरी फासू नका. त्याऐवजी रंगमंत्र्यांना अ ब क ड अशी नावे द्या.”
याबाबत महापालिकेचे उपायुक्त संजय जाधव यांनी सांगितले की, “अत्रे रंगमंदिराची देखभाल दुरुस्तीसाठी तीन कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. या कामाचा आदेश देखील करण्यात आलेला आहे. पावसाळ्यात काम करणे शक्य नव्हते. त्यानंतर निवडणुकीच्या आचारसंहिता लागली. देखभाल दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. त्याचबरोबर डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले रंग मंदिराच्या देखभाल दुरुस्ती करतात स्ट्रक्चरल ऑडिट केले आहे. त्यानुसार दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत”
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
कियारा आडवाणीचे सुंदर ड्रेसमध्ये फोटोशूट; चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव
सोनू सूदने केला बॉलिवूडचा पर्दाफा; म्हणाला, ‘इथे पार्ट्यांमध्ये…’