बॉलिवूडचा ‘भाईजान’ सलमान खान पुन्हा एकदा ‘राधे’ बनून ईदला आपल्या चाहत्यांना भेट देणार आहे. गुरुवारी (१३ मे) सलमान आणि दिशा पटानी अभिनित ‘राधे: युवर मोस्ट वाँटेड भाई’ चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीझ होणार आहे. या चित्रपटाबाबतची चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तरीही या चित्रपटातील एक पात्र असे आहे, ज्याचे वास्तविक आयुष्याची कहाणी खूपच रंजक आहे. खरं तर सलमान खानच्या ‘राधे’ या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारत असलेला संगय शेल्त्रिम सलमान खानचा खूप मोठा चाहता आहे. या चित्रपटातून तो बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. त्याला सलमान खानने या चित्रपटातून मोठा ब्रेक दिला आहे.
एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत संगय शेल्त्रिमने सांगितले की, त्याची सलमानसोबत भेट ‘दबंग ३’च्या सेटवर झाली होती. भूतानचा राहणारा संगयला कदाचित त्यावेळी हा अंदाजही आला नसेल की, ज्या सुपरस्टार सलमान खानशी तो चाहता म्हणून भेटत आहे, एक दिवशी त्याच्याच चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारण्याची संधी मिळेल.
संगयने म्हटले की, “हा मोठा ब्रेक मला सलमान खानने दिला आहे आमि माझ्यातील प्रतिभा ओळखली आहे. खरं तर मी सन २०१९ मध्ये मुंबईला आलो होतो. मी मित्रासोबत सलमान सरांना भेटायला गेलो होतो. मी त्यांच्या खूप मोठा चाहता आहे. सलमान सरांनी खूप चांगल्या प्रकारे माझी भेट घेतली होती. आम्ही दोघेही बॉडी बिल्डर आहोत, त्यामुळे त्यावरही आम्ही बऱ्याच चर्चा केल्या.”
“मी सलमान सरांचा लहानपणापासून मोठा चाहता आहे. जेव्हा ‘मैंने प्यार किया’ चित्रपट रिलीझ झाला होता, तेव्हा मी ७-८ वर्षांचा होतो. मी तर सलमान सरांना भेटून भूतानला परत गेलो होतो. तेवढ्यात एक दिवसानंतर माझ्या मित्राचा फोन आला की, सलमान सरांनी माझी आठवण काढली आहे. या गोष्टीने मी खूप खुश झालो होतो. त्यानंतर मला फोन आला की, एका चित्रपटात रोल मिळणार आहे. त्यानंतर सलमान सरांसोबत ‘राधे’ चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली,” असेही पुढे बोलताना तो म्हणाला.
संगयसाठी ही खूप मोठी संधी आहे. त्याने म्हटले की, “मी तर फक्त सलमान सरांशी एक चाहता म्हणून भेटायला आलो होतो. मी त्यांच्यासोबत सेल्फी घेतली आणि त्यांनी मला आपल्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी दिली. मी त्यांचा आभारी आहे. या चित्रपटात मी रणदीप हुड्डा आणि गौतम गुलाटीसोबत खलनायकाच्या भूमिकेत आहे.”
सलमान खानचे चित्रपट नेहमीच ईदच्या दिवशी रिलीझ होतात आणि चाहत्यांमध्ये चांगली कामगिरीही करतात. तरीही सध्या कोरोना असल्यामुळे चित्रपट थिएटरमध्ये रिलीझ न करता ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीझ केला जात आहे. चित्रपटात दिशा पटानी आणि जॅकी श्रॉफही मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘चित्रपटसृष्टीमध्ये होतो लिंगभेद’, अभिनेत्री दिया मिर्झाचा फिल्म इंडस्ट्रीवर मोठा आरोप