Friday, March 29, 2024

‘चित्रपटसृष्टीमध्ये होतो लिंगभेद’, अभिनेत्री दिया मिर्झाचा फिल्म इंडस्ट्रीवर मोठा आरोप

आपल्या सौंदर्याने आणि सहजसुंदर अभिनयाने चाहत्यांना पुरते घायाळ करणारी बॉलिवूड अभिनेत्री म्हणजेच दिया मिर्झा. दियाने सन 2001 मध्ये ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. ती सध्या चांगलीच चर्चेत आहे. ती आपल्या गरोदरपणाचा आनंद लुटत आहे. तिने आपल्या कारकिर्दीत अनेक चढ- उतार पाहिले आहेत. एका मुलाखतीदरम्यान तिने चित्रपटसृष्टीवर आरोप लावत सेक्सिझमबाबत मोठा खुलासा केला आहे.

ब्रुट इंडियाला दिलेल्या मुलाखतीत दिया मिर्झाने सांगितले की, “लोक लिहित होते, विचार करत होते आणि सेक्सिस्ट सिनेमा बनवत होते. या सर्वांचा मी भाग होते.” तिने पुढे सांगितल्यानुसार, “माझा पहिला चित्रपट ‘रहना है तेरे दिल में’मध्येही सेक्सिझम होता. मी अशा लोकांसोबत काम करत होते.”

दियाने सांगितले की, “एक मेकअप आर्टिस्ट पुरुष होता, महिला नव्हती. दुसरीकडे एक हेअरड्रेसर महिला होती. ज्यावेळी मी चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी चित्रपटाच्या क्रूमध्ये 120 पेक्षा अधिक लोकांमध्ये केवळ 4 ते5 महिला असायच्या. आपण पितृसत्ताक समाजात राहतो. चित्रपटसृष्टीमध्ये पुरुषांचा दबदबा आहे. चित्रपटसृष्टीमध्ये लिंगभेदही होतो. कधी कधी मला वाटते की, अनेक पुरुष जे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते आहेत, त्यांना आपल्या सेक्सिस्ट विचारांबद्दल माहितीच नाही.”

दियाविषयी बोलायचं झालं, तर ती 15 फेब्रुवारी रोजी दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकली आहे. तिने मुंबईचा व्यावसायिक वैभव रेखीसोबत लग्न केले आहे. यानंतर 1 एप्रिलला तिने आपल्या गरोदरपणाची बातमीही चाहत्यांसोबत शेअर केली. परंतु यामुळे तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. दिया सोशल मीडियावर आपले मत स्पष्ट करत असते. विशेष म्हणजे ती आपल्या रोखठोक वक्तव्यासाठी ओळखली जाते.

दिया शेवटची सन 2020 मध्ये आलेल्या ‘थप्पड’ या चित्रपटात दिसली होती. यामध्ये अभिनेत्री तापसी पन्नू आणि अभिनेता पवैल गुलाटी मुख्य भूमिकेत होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अनेक अडचणींना तोंड देऊन आई बनलीय दिया मिर्झा, शेअर केला ‘निअर डेथ एक्सपेरिअन्स’

‘अभिनेता हा नेहमीच अभिनेता असतो, जबाबदारीचे ओझे निर्मात्याच्या खांद्यावर असते’ दिया मिर्झाचे मोठे वक्तव्य

हे देखील वाचा