ब्राझीलचा प्रसिद्ध गायक एमसी केविन याचे निधन झाले आहे. २३ वर्षीय केविनचा मृत्यू हॉटेलच्या पाचव्या मजल्यावरून खाली पडून झाल्याचे, वृत्त आहे. केविन ब्राझीलच्या रिओ दि जानेरोमधील एका हॉटेलमध्ये थांबला होता. ही घटना रविवारी (१६ मे रोजी) घडली असून, केविनच्या पाचव्या मजल्यावरून पडल्याने पोलिस आश्चर्यचकित झाले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
केविन हॉटेलच्या ११ व्या मजल्यावर राहत होता, तर पाचव्या मजल्यावर, तो त्याच्या काही मित्रांना भेटण्यासाठी त्यांच्या खोलीत पोहोचला. केविन हॉटेलच्या बाल्कनीत होता, जिथून नंतर तो खाली पडला. घटनास्थळी दाखल झालेल्या पथकाने, अपघातानंतर गायकाला ताबडतोब रुग्णालयात नेले, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
https://www.instagram.com/p/CO-YV7vrOd8/?utm_source=ig_web_copy_link
केविनने दोन आठवड्यांपूर्वीच त्याची गर्लफ्रेंड डिओलेने बेजेराशी लग्न केले होते. डिओलेने ही एक गुन्हेगारी वकील आहे. केविनच्या निधनानंतर, त्यांच्या लग्नाचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर करत डिओलेनेने चाहत्यांना ही दुःखद बातमी दिली. डिओलेनेने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “तू माझ्या आयुष्याचे प्रेम आहेस आणि नेहमीच राहशील. तो माणूस ज्याने मला सर्वात जास्त प्रेम आणि आदर दिला. देवाकडे जा, मी तुझ्यावर कायम प्रेम करीन.”
केविनच्या आईनेही आपल्या मुलाला श्रद्धांजली वाहत, सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले की, “शेवटच्या वेळी माझे केविनशी बोलणे झाले होते, तेव्हा तो म्हणाला होता, आई लव यू मम.” विशेष म्हणजे, एमसी केविनने आपले पहिले गाणे २०१३ मध्ये प्रसिद्ध केले. त्यावेळी तो केवळ १६ वर्षांचा होता. त्याचे ‘कॅव्हॅलो डी ट्रॉआ’ हे हिट गाणे यूट्यूबवर लाखो वेळा पाहिले गेले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-नेहा कक्करने साजरा केला आई-वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस; सोशल मीडियावर शेअर केले गोड फोटो










