‘सरदारजी ३’ चित्रपटात पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरसोबत काम केल्यामुळे अभिनेता दिलजीत दोसांझ सध्या वादात सापडला आहे. दरम्यान, सोमवारी ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह (Nasiruddin shah) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून दिलजीत दोसांझला पाठिंबा दिल्याचे वृत्त आहे. नंतर त्यांनी ती पोस्ट डिलीट केली. यावरून अभिनेत्यावर टीका होत असताना त्यांनी यावर आपले मौन सोडले आहे.
नसीरुद्दीन शाह यांनी त्यांच्या फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी दिलजीतच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याबद्दल त्यांच्यावर होत असलेल्या टीकेवर मौन सोडले आहे आणि असे काहीही पोस्ट केलेले नसल्याचे म्हटले आहे. फेसबुकवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्याने लिहिले आहे की, ‘मी दिलजीत दोसांझबद्दलची माझी पोस्ट डिलीट केलेली नाही. मला कोणत्याही प्रकारच्या टीकेची पर्वा नाही’.
नसीरुद्दीन शाह यांनी ज्या पोस्टबद्दल डिलीट केल्याचा दावा केला जात आहे ती सोशल मीडियावर दिसत नाही. दिलजीतच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यानंतर झालेल्या टीकेमुळे त्यांनी पोस्ट डिलीट करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. सोमवारी केलेली पोस्ट डिलीट केल्यानंतर नसीरुद्दीन शाह यांनी मंगळवारी फेसबुकवर एक गूढ संदेश लिहिला.
मंगळवारी नसीरुद्दीन शाह यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी शास्त्रज्ञ आणि तत्वज्ञानी जॉर्ज क्रिस्टोफ लिचटेनबर्ग यांचे विचार शेअर केले आहेत. त्यांनी संदेशात लिहिले आहे की, ‘एखाद्याची दाढी जाळल्याशिवाय गर्दीत सत्याची मशाल घेऊन जाणे जवळजवळ अशक्य आहे.’ अभिनेत्याच्या या नवीन पोस्टवर वापरकर्त्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. काहींनी त्यांच्यावर टीका केली तर काहींनी त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या अधिकाराचे समर्थन केले.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
जेव्हा पुनीत इस्सरवर लागले होते अमिताभ बच्चन यांना मारण्याचा आरोप; अभिनेत्याने सांगितले सत्य
दशावतार चित्रपटाचा पहिला लुक समोर; दिलीप प्रभावळकर महत्वाच्या भूमिकेत