Monday, July 1, 2024

अरे व्वा! आणखी ७८ वर्षे सोनी मॅक्सवर दिसणार ‘सूर्यवंशम’ चित्रपट, कारणही आहे तितकंच रंजक

एक असा चित्रपट आहे, जो आपण टीव्ही बघत असताना बर्‍याचदा आपल्या नजरेखालून जात असतो. विशेषत: सोनी मॅक्स चॅनलवर हा चित्रपट प्रसारित केला जातो. आतापर्यंत या चित्रपटाचे नाव कदाचित तुमच्या डोक्यातही आले असेल. हा आहे १९९९ साली रिलीझ झालेला महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘सूर्यवंशम.’ टीव्हीवर सर्वाधिक प्रसारित केल्याचा विक्रम या चित्रपटाने केला आहे. हीरा ठाकूर, राधा, गौरी आणि मेजर रणजित अशी चित्रपटाची बरीच पात्रं प्रेक्षकांच्या मनात अजूनही कायम आहेत. या चित्रपटाचा कोणताही सीन असो किंवा डायलॉग असो, प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांना अगदी तोंडपाठ आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाविषयी अनेक मीम्सही व्हायरल होत असतात. मात्र, टीव्हीवर हा चित्रपट वारंवार प्रसारित होण्याचे कारण तुम्हाला माहित आहे का? जाणून घेऊयात या चित्रपटाविषयी क्वचितच ऐकलेले तथ्य.

-अमिताभ बच्चन यांचा ‘सूर्यवंशम’ बॉक्स ऑफिसवर फ्लॉप चित्रपट ठरला होता. चित्रपटाचे बजेट आणि कमाई समान होती, म्हणून अतिरिक्त कमाईच्या बाबतीत हा चित्रपट मागे पडला. पण जेव्हा हा चित्रपट टीव्हीवर रिलीझ झाला, तेव्हा प्रेक्षकांकडून याला खूपच पसंती मिळाली. म्हणजेच रुपेरी पडद्यावर फ्लॉप, परंतु टीव्हीवर हिट.

-जरी ‘सूर्यवंशम’ बॉलिवूडमध्ये फ्लॉप ठरला, तरीही या चित्रपटाची कहाणी बरीच चांगली व दमदार होती. हेच कारण होते की, हा चित्रपट केवळ हिंदीमध्येच नव्हे, तर तमिळ, तेलुगु, कन्नड आणि भोजपुरी भाषेतही बनविला गेला.

-या चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी बाप-मुलाची दुहेरी भूमिका साकारली होती. परंतु तुम्हाला माहिती आहे का? की पूर्वी या चित्रपटासाठी अमिताभ बच्चन व त्यांच्या मुलाच्या भूमिकेसाठी अभिषेक बच्चनचे नाव घेण्यात आले होते. पण काही कारणांमुळे हे होऊ शकले नाही.

-या चित्रपटात अमिताभ बच्चन यांची तरुण व्यक्तिरेखा म्हणजेच हीरा ठाकूरच्या पत्नीची भूमिका, साऊथ अभिनेत्री सौंदर्याने साकारली होती. हा चित्रपट रिलीझ झाल्यानंतर, काही वर्षांनी तिचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला. तेव्हा माध्यमांत आलेल्या वृत्तानुसार, या अपघातावेळी सौंदर्या गर्भवती होती.

-फार थोड्या लोकांना माहिती असेल की, आधी पूजा बत्राला या चित्रपटासाठी साईन केले जाणार होते. परंतु त्यावेळी ती इतर प्रकल्पांमध्ये व्यस्त होती, ज्यामुळे तिने हा चित्रपट सोडला.

-हा चित्रपट रिलीझ झाल्यानंतर २ महिन्यांनी सोनी मॅक्स चॅनेल सुरू करण्यात आले होते. याच चॅनेलने सूर्यवंशम या चित्रपटाचे १०० वर्षांपर्यंतचे हक्क विकत घेतले आहेत. त्यांपैकी २२ वर्षे आता पूर्ण झाली आहेत आणि सोनी मॅक्सकडे अद्याप ७८ वर्षांचे हक्क बाकी आहेत.

-तुम्हाला माहिती आहे का? अमिताभ बच्चन यांचा हा चित्रपट अभिनेत्री रेखाशीही संबंधित आहे. वास्तविक, चित्रपटात अमिताभ बच्चन (दोघे ठाकूर भानु प्रताप आणि हीरा ठाकूर) यांच्या पत्नीची भूमिका साकारणार्‍या अभिनेत्रींना (जयसुधा आणि सौंदर्या) रेखाने आवाज दिला आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दाक्षिणात्य सुपरस्टार ज्युनिअर एनटीआरच्या लग्नात झाला होता मोठा वाद; तब्बल १० हजार पाहुणे होते उपस्थित, खर्चाचा आकडा वाचून फिरतील डोळे

-जेव्हा ऐश्वर्याच्या चाहत्याने तिला लग्नासाठी केले होते प्रपोज; ‘अशी’ दिली होती पती अभिषेकने प्रतिक्रिया

हे देखील वाचा