अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) आणि राज कुंद्रा यांच्याशी संबंधित ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात कंपनीच्या खात्यांमधील व्यवहारांची चौकशी सुरू आहे. वृत्तसंस्था पीटीआयनुसार, ‘व्यावसायिक राज कुंद्रा आणि त्यांची अभिनेत्री पत्नी शिल्पा शेट्टी यांच्याशी संबंधित ६० कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात पैशांच्या व्यवहारांची चौकशी सुरू आहे. दोघांनी केलेले खर्च खरे होते की नाही हे शोधण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकरणाची चौकशी करणारी मुंबई पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा (EOW) २०१५ पासून या हाय-प्रोफाइल जोडप्याशी जोडलेल्या कंपनीच्या बँक खात्यांची तपासणी करत होती जेणेकरून त्यात दाखवलेले खर्च खरे आहेत की नाही हे निश्चित करता येईल. त्यांनी सांगितले की, खात्यांच्या आणि निधी प्रवाहाच्या तपासणीदरम्यान, शिल्पा शेट्टीला कंपनीकडून ४ कोटी रुपये शुल्क म्हणून मिळाले असल्याचे आढळून आले.
आर्थिक गुन्हे शाखेचे (EOW) अधिकारी आता बंद पडलेल्या कंपनीशी संबंधित व्यक्तींचे जबाब नोंदवत आहेत. अधिकाऱ्याने सांगितले की पोलिसांनी आतापर्यंत राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी आणि बेस्ट डील टीव्ही प्रायव्हेट लिमिटेडचे आरपी (रिझोल्यूशन प्रोफेशनल) यांचे जबाब नोंदवले आहेत. अभिनेत्रीने यापूर्वी तिच्या जबाबात म्हटले होते की ती कंपनीच्या दैनंदिन कामकाजात सहभागी नव्हती आणि प्लॅटफॉर्मवर (बेस्ट डील) दिसण्यासाठी तिला सेलिब्रिटी फी देण्यात आली होती.
कर्ज-सह-गुंतवणूक करारात व्यापारी दीपक कोठारी यांची अंदाजे ₹60 कोटींची फसवणूक केल्याबद्दल शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरुद्ध मुंबईच्या जुहू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कोठारी यांनी त्यांच्या तक्रारीत आरोप केला आहे की सेलिब्रिटी जोडप्याने त्यांना 2015 ते 2023 दरम्यान त्यांच्या कंपनीत ₹60 कोटी गुंतवण्यास प्रवृत्त केले होते, परंतु त्यांच्या वैयक्तिक फायद्यासाठी निधीचा गैरवापर करण्यात आला. शिल्पा आणि राज यांनी कंपनीत गुंतवणूक करण्याऐवजी पैसे स्वतः खर्च केले असा व्यावसायिकाचा आरोप आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
रंगभूमीवर धमाल! उत्क्रांती घडवणारे ‘माकडचाळे’ बालनाट्याचा दिवाळीत शानदार शुभारंभ!