मागच्या काही काळापासून कलाकारांपेक्षा अधिक कलाकारांची मुलेच जास्त लाईमलाईट्मधे आले आहेत. सोशल मीडियावर देखील स्टार्स किड्सला लाखो फॉलोवर्स असतात. प्रेक्षकांना सुद्धा या स्टार्स किड्सच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यात खूप रस असतो. बॉलिवूडमध्ये अनेक स्टार्स किड्स आहे त्यातही शाहरुख खानच्या मुलांची एक वेगळीच क्रेझ आपल्याला पाहायला मिळते.
किंग खानची मुलगी सुहाना तर सोशल मीडिया सेन्सेशन झाली आहे. तिला फॉलो करणाऱ्यांची संख्या मिलियनमध्ये आहे. याच सुहाना संदर्भात सध्या एक किस्सा सध्या खूपच गाजताना दिसत आहे. शाहरुख हा सिनेमांमध्ये कोणत्याही प्रकारच्या भूमिकेत दिसला तरी तो खऱ्या आयुष्यात परिवाराची काळजी घेणारा अतिशय संवेदनशील व्यक्ती आहे. हे नेहमी शाहरुखच्या वागण्या, बोलण्यातून आपल्याला दिसतच असते.
शाहरुखचे त्याच्या मुलांवर किती प्रेम आहे याची तर अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतील. त्यातही शाहरुख सुहानाच्या बाबतीत खूपच जास्त पझेसिव्ह आहे. एकदा शाहरुख करण जोहरच्या प्रसिद्ध अशा ‘कॉफी विथ करण’मध्ये आलिया भट्टसोबत आला होता. त्यावेळी करणने आलियाला तिचा वयाच्या कितव्या वर्षी पहिला बॉयफ्रेंड होता असा प्रश्न विचारला. यावर आलियाने १६ उत्तर दिले.
त्यानंतर त्याने शाहरुखला विचारले की, ‘जर सुहानाचा वयाच्या १६ व्या वर्षी बॉयफ्रेंड असेल आणि त्याने तिला किस करण्याचा प्रयत्न केला तर तू काय करशील?’
यावर शाहरुखने ‘मी त्या मुलाचे ओठ कापून टाकेल,’ असे उत्तर दिले. यावर करण म्हणाला, ‘तू हे नक्कीच करू शकतो.’ यावर शाहरुख म्हणाला, ‘हो १०० टक्के. सुहानाला हे सर्व माहित आहे आणि म्हणूनच तिचा अजूनही कोणताच बॉयफ्रेंड नाही.’
इतर वेळा शाहरुख एक कूल वडील म्हणून मीडियामध्ये आणि फॅन्समध्ये ओळखला जातो. मात्र, जेव्हा सुहानाची गोष्ट येते, तेव्हा तो एक सामान्य वडील होतो. तसेच आपल्या मुलीबाबत अधिक पझेसिव्ह बनतो. सुहानाच्या मागच्या काही काळापासून चित्रपटांमध्ये पदार्पणाच्या बातम्या येत आहेत. मात्र, खरंच सुहाना पदार्पण करणार की नाही हे येणारा काळच सांगेल.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…