Friday, March 29, 2024

ऋतिक रोशनमुळे गेला असता माझा जीव! ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’मधील ‘तो’ व्हिडिओ शेअर करत अभिनेत्याने केला खुलासा

‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटाला रिलीझ होऊन 10 वर्षे पूर्ण होत आली आहेत. आता नुकतंच अभिनेता अभय देओलने चित्रपटाच्या सेटवरील एका घटनेचा उल्लेख केला आहे. ती घटना वाचून तुम्हीही शॉक व्हाल…

त्या घटनेबाबत बोलताना अभिनेता अभय देओल याने सांगितले की, त्याला वाटले होते की त्याचा मृत्यू होणार आहे. जोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटात हृतिक रोशन, फरहान अख्तर, कॅटरिना कैफ आणि कल्की कोचलीन यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

टायगर बेबी फिल्म्सने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभय देओल चित्रपटाशी संबंधित आठवणी शेअर करताना दिसत आहे. त्या क्षणाविषयीही त्याला आठवले, जेव्हा त्याला वाटले होते की, तो मरणार आहे.

घटनेबद्दल बोलताना त्याने सांगितले की, ‘हृतिकने गाडी पार्क केली होती ज्यामध्ये तो आणि फरहान मागील सीटवर बसले होते. परंतु हृतिक गाडीचा हँडब्रेक खेचणे विसरला, यामुळे कार हळू हळू खाईच्या दिशेने जाऊ लागली होती. परंतु, हृतिक लगेचच गाडीच्या आत गेला आणि गाडी थांबवली.’ या व्हिडिओमध्ये फरहान मागच्या सीटवरून उडी मारतानाही दिसला आहे.

अभय व्हॉईस ओवरमध्ये म्हणाला की, “या सीनच्या शूटिंग दरम्यान हृतिकने मला आणि फरहानला जवळजवळ ठार मारले असते. फरहान खरोखर वेगवान होता. त्याने ताबडतोब उडी मारली आणि मी आत विचार करत बसलो की, मी आता मरणार आहे.” चित्रपटाचे शूट पुन्हा बघून, कलाकार या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करत होते.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “आम्ही रुपेरी पडद्यासाठी चित्रपट बनवितो. परंतु मोठे चित्रपट बनवण्यामागे बऱ्याच लघुकथा असतात, ज्या नेहमीच समोर येत नाहीत. इथे आम्ही ‘ऑफ द रेकॉर्ड’ सिरीज दाखवत आहोत, जिथे टायगर बेबी ग्रुपचे कलाकार आणि क्रू मेंबर्स काही उत्तम सीन्समागील किस्से सांगत आहेत. ते सांगत आहेत की, शूटच्या वेळी त्यांची मानसिकता कशी होती आणि हा खास सीन त्यांना नेहमीच का लक्षात राहील.”

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘चित्रा मेरी सासू’ म्हणणाऱ्या उर्फीला चित्रा वाघ यांचे जशास तसे उत्तर, म्हणाल्या….
एकेकाळी ‘या’ अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं होतं ‘हँडसम हंक’ ऋतिक रोशनचं नाव; चौघींनी दुसऱ्यासोबत संसारही थाटला

हे देखील वाचा