Wednesday, January 14, 2026
Home साऊथ सिनेमा दर्शनची ‘द डेव्हिल’; हिट की फ्लॉप? प्रेक्षक काय म्हणत आहेत, सोशल मीडियावर पडले रिव्ह्यूजचा वर्षाव

दर्शनची ‘द डेव्हिल’; हिट की फ्लॉप? प्रेक्षक काय म्हणत आहेत, सोशल मीडियावर पडले रिव्ह्यूजचा वर्षाव

दर्शन थुगुदीपा यांचा बहुप्रतिक्षित अ‍ॅक्शनपट ‘द डेव्हिल’ आज, 11 डिसेंबर 2025 रोजी भव्य दिमाखात थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. मिलन प्रकाश दिग्दर्शित आणि रचना राय अभिनीत हा चित्रपट पहिल्याच दिवशी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला असून सोशल मीडियावर त्याच्या पुनरावलोकनांचा अक्षरशः वर्षाव होत आहे.

चित्रपटाच्या थिएटर रिलीजसोबतच ‘एक्स’ (म्हणजे पूर्वीचे ट्विटर) वर #TheDevilMovie हा हॅशटॅग ट्रेण्डिंगमध्ये आला. दर्शनच्या दमदार अभिनयाने भारावलेल्या चाहत्यांनी त्याला ‘व्हॉल्केनो ऑफ परफॉर्मन्स’ असे संबोधले आहे. एका वापरकर्त्याने लिहिले आहे, “दर्शन हा ज्वालामुखीसारखा आहे; त्याची प्रत्येक गर्जना, प्रत्येक अश्रू आणि प्रत्येक सीन पडद्यावर वादळ निर्माण करतो. तो जणू राजा आपल्या राज्यावर पुन्हा अधिराज्य मिळवत आहे.” त्याच वापरकर्त्याने या चित्रपटाला ब्लॉकबस्टर घोषित करत चाहत्यांना थिएटरमध्ये जाऊन पाहण्याचे आवाहन केले आहे.

दुसऱ्या एका नेटिझनने या चित्रपटाला 10 पैकी 10 गुण देत म्हटले आहे की हा दर्शनच्या कारकिर्दीतील एक सर्वोत्तम अभिनय आहे. पहिल्या फ्रेमपासून शेवटच्या फ्रेमपर्यंत चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवतो, अशा प्रतिक्रिया चाहत्यांकडून व्यक्त होत आहेत. दर्शनचा स्वॅग, दमदार संवादफेक, भव्य फाईट सीक्वेन्स आणि हलक्या फुलक्या कॉमेडीने चित्रपट अधिकच रंगतदार बनल्याचे मतही त्यांनी मांडले. त्याचबरोबर अच्युत कुमार यांच्या अभिनयाचेही विशेष कौतुक करण्यात आले आहे. रचना रायसह इतर कलाकारांनीही आपापल्या भूमिका उत्तमरित्या साकारल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

माञ, काही प्रेक्षकांनी चित्रपटाच्या इंटरवल ब्लॉकबद्दल मिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. पहिल्या भागातील दर्शनची स्टायलिश एन्ट्री, कथा आणि ट्विस्ट आवडले असले तरी इंटरवल ब्लॉक अपेक्षेपेक्षा थोडासा फिका वाटल्याचीही नोंद घेण्यात आली. गाणी, पार्श्वसंगीत आणि विनोदी दृश्ये केवळ काही ठिकाणी प्रभावी ठरल्याचे मार्क केले गेले आहे. दुसऱ्या भागात पटकथेची गती किंचित कमी झाली असली तरी दर्शनच्या प्रभावी अभिनयामुळे ती कमतरता झाकली गेल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

‘द डेव्हिल’ची कथा काय सांगते? -द डेव्हिल’ हा कृष्णा नावाच्या साध्या सिनेमाप्रेमी तरुणाची कथा आहे. चित्रपटसृष्टीविषयीची त्याची वेडी आवड, आवडत्या नायकांचे अनुकरण आणि एक दिवस स्वतःचे कटआउट थिएटरसमोर पाहण्याचे त्याचे स्वप्न… याच स्वप्नांच्या प्रवासात त्याच्यासमोर उभ्या ठाकलेल्या जीवन बदलणाऱ्या घटनांवर हा चित्रपट आधारलेला आहे.

चित्रपटात दर्शन आणि रचना राय व्यतिरिक्त महेश मांजरेकर, अच्युत कुमार, शर्मिला मांड्रे यांच्यासह अनेक दमदार कलाकार झळकले आहेत.एकूणच, ‘द डेव्हिल’ (The Devil)हा दर्शनच्या प्रभावी अभिनयाचा उत्सव ठरत असून प्रेक्षकांनी त्याला पहिल्याच दिवशी मोठा प्रतिसाद दिला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हॉलिवूड दिग्दर्शकासोबत काम करणार कार्तिक आर्यन ? डॅरेन अ‍ॅरोनोफ्स्कीसोबतची त्याची भेट चर्चेत

हे देखील वाचा