×

बच्चन पांडे सिनेमातील पहिले डेव्हिल सॉन्ग प्रदर्शित, ‘मार खायेगा’ गाण्यात दिसले अक्षयचे क्रूर रूप

लवकरच होळीच्या मुहूर्तावर अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित बहुचर्चित ‘बच्चन पांडे’ हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. या सिनेमाच्या ट्रेलरने तर सर्वच प्रेक्षकांमध्ये तुफान उत्सुकता निर्माण केली आहे. आता या सिनेमातील पहिले गाणे ‘मार खाएगा’ प्रदर्शित झाले आहे. या गाण्यात अक्षय कुमारला अँटी हिरो भूमिकेत पाहायला मिळत आहे. याशिवाय या गाण्यात अक्षय कुमारची क्रूर बाजू देखील पाहायला मिळत आहे. या गाण्यालाच ‘द डेव्हिल सॉन्ग’ म्हणून प्रदर्शित करण्यात आले आहे. या गाण्यात अक्षयचे दमदार ऍक्शन सीन देखील दिसत आहे.

‘मार खायेगा’ या गाण्याचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे गाण्यात दिसणारी अक्षयची क्रूर बाजू. याशिवाय या गाण्याची सिग्नेचर स्टेप देखील गाण्याचे हायलाइट आहे. या गाण्याला प्रसिद्ध दिग्दर्शक गणेश आचार्यने कोरिओग्राफ केले असून, गणेश आचार्य नेहमीच त्याच्या हटके आणि भूमिकेला सूट होणाऱ्या स्टेप्ससाठी ओळखले जातात. ‘मार खायेगा’ या गाण्याला अक्षय कुमारचे इंट्रोडक्शन सॉन्ग देखील म्हटले जाऊ शकते. या गाण्याचे बोल, डान्स स्टेप अशा पद्धतीच्या असून, ज्यात अक्षय कुमारची भूमिका, त्याचे तेवर, आक्रमकता अतिशय वास्तविक पद्धतीने उठून येत आहे.

या गाण्याला रॅप अंदाजमध्ये विक्रम मोंट्रोसने संगीत दिले असून, फरहाद भिवंडीवाला, विक्रम आणि अजीम दयानी यांनी या गाण्याचे शब्द लिहिले आहे. तर विक्रम आणि फरहादने गाण्याला आवाज दिला आहे. अक्षयने हे गाणे सोशल मीडियावर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले, “कारण भीती तयार करून ठेवणे आवश्यक झाले आहे, आणि या गाण्याला डेव्हिल सॉन्ग नाव देण्यात आले आहे. ‘बच्चन पांडे’ या सिनेमात अक्षय कुमारची भूमिका अँटी हिरोची आहे.

गणेश आचार्यने या गाण्यात अक्षयला जी सिग्नेचर स्टेप दिली आहे, ती पाहून तुम्हाला पुष्पा सिनेमातील गाण्यांची नक्कीच आठवण येईल. या सिनेमातील गाण्याना देखील गणेश आचार्यनेच कोरिओग्राफ केले आहे. या सिनेमातील गाणी आणि त्यांच्या डान्स स्टेप खूपच लोकप्रिय झाल्या आहेत. ‘मार खायेगा’ गाण्याला ३०० डान्सर्ससोबत मुंबईतच शूट केले गेले आहे. या सिनेमात अक्षय कुमारसोबत कृती सेनन, अर्शद वारसी, पंकज त्रिपाठी, संजय मिश्रा, अभिमन्यु सिंह, जॅकलिन फर्नांडिस आदी मुख्य भूमिकेत असून, हा सिनेमा १८ मार्चला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा :

Latest Post