अभिनेता दीपक तिजोरीची फसवणूक झाली आहे. त्याच्या चित्रपटासाठी निधी मिळवून देण्याच्या नावाखाली त्याची फसवणूक करण्यात आली. बॉलिवूड अभिनेता दीपक तिजोरीला त्याच्या आगामी चित्रपटासाठी निधी मिळवून देण्याच्या बहाण्याने अडीच लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे एका पोलिस अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले.
पोलिसांनी सांगितले की, दीपक तिजोरी त्याच्या नवीन चित्रपटासाठी आर्थिक मदत शोधत होता. दरम्यान, एका मित्राने त्याची ओळख एका आरोपीशी करून दिली, जो एका संगीत कंपनीशी संबंधित असल्याचा दावा करतो. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये तिजोरीने चित्रपट निर्माती असल्याचा दावा करणाऱ्या एका महिलेलाही भेटले आणि चित्रपटासाठी गुंतवणूकदार शोधण्यात मदत करण्याचे आश्वासन दिले. तिने कामासाठी पाच लाख रुपये मागितले. त्यानंतर दीपक तिजोरीने अडीच लाख रुपयांचा पहिला हप्ता दिला, असे अधिकाऱ्याने सांगितले.
आरोपींनी एका आठवड्यात एका प्रसिद्ध कंटेंट कंपनीकडून ‘लेटर ऑफ इंटरेस्ट’ देण्याचे आश्वासन दिले होते आणि त्यासाठी त्यांनी करार केला होता. तथापि, त्यांनी वचन दिलेले कागदपत्र दिले नाही आणि त्यानंतर दीपक तिजोरीच्या कॉल आणि मेसेजेसना उत्तर देणे बंद केले असा आरोप आहे. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, जेव्हा अभिनेत्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले तेव्हा त्याने गेल्या महिन्यात बांगूर नगर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध तक्रार दाखल केली. अधिकाऱ्याने सांगितले की, तिन्ही आरोपींना चौकशीसाठी बोलावले जाईल. प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा


