लाइमलाइटपासून दूर राहून मानसिक आरोग्याला प्राधान्य दिल्यानंतर इमरान खानने अखेर दमदार कमबॅक करत पुन्हा एकदा चर्चेत स्थान मिळवले आहे. या संपूर्ण प्रवासाचे श्रेय त्याने आपल्या गर्लफ्रेंड लेखा वॉशिंग्टनला दिले आहे. इमरानने सांगितले की, त्याची मुलगी इमारा आणि पार्टनर लेखा हेच त्याच्या रिकव्हरीचे खरे आधारस्तंभ ठरले. २०१९ मध्ये अवंतिका मलिकपासून घटस्फोट घेतल्यानंतर लेखासोबत पुन्हा प्रेम सापडणं, हा इमरानसाठी पूर्णपणे बदल घडवणारा अनुभव ठरला. तो आपल्या आयुष्यातील या टप्प्याला “एम्पॉवरिंग, अपलिफ्टिंग आणि टू-वे प्रोसेस” असे म्हणतो.
दिलेल्या एका मुलाखतीत इमरान खानने (Imran Khan)आपल्या सध्याच्या नात्याबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं. तो म्हणाला, “खरं प्रेम मिळालं की ते तुम्हाला ताकद देतं आणि तुम्हाला बरे करतं. निःस्वार्थपणे प्रेम देणं आणि प्रेम मिळणं, दोन्ही गोष्टी माणसाला अधिक मजबूत बनवतात. मला हे प्रेम मुलगी इमारा आणि माझी पार्टनर लेखा यांच्याकडून मिळालं. हेच माझ्या रिकव्हरीसाठी आणि वैयक्तिक वाढीसाठी खूप महत्त्वाचं ठरलं.”
अलीकडेच ‘हॅपी पटेल: खतरनाक जासूस’ या चित्रपटाच्या स्क्रीनिंगदरम्यान इमरान आणि लेखा एकत्र सार्वजनिक ठिकाणी दिसले होते. इमरानच्या कमबॅकसोबतच लेखा वॉशिंग्टनबद्दलही लोकांची उत्सुकता वाढली आहे. लेखा केवळ टॅब्लॉइड्समधील चेहरा नसून ती एक बहुआयामी कलाकार आहे. १९८७ मध्ये जन्मलेल्या लेखाचे वडील बर्मी, इटालियन आणि पंजाबी वारशाचे होते, तर आई महाराष्ट्रीयन आहे. लेखाचे बालपण चेन्नईत गेले.
इमरानला भेटण्यापूर्वीच लेखाचा क्रिएटिव्ह प्रवास सुरू झाला होता. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनमधून शिक्षण घेतलेली लेखा एक यशस्वी प्रॉडक्ट डिझायनर आणि फिल्ममेकर आहे. तिने ‘स्पूनरिझम’ आणि ‘सन’ यांसारख्या शॉर्ट फिल्म्सही बनवल्या आहेत. करिअरच्या सुरुवातीला VJ आणि मॉडेल म्हणून काम केल्यानंतर तिने साऊथ इंडियन सिनेमात स्वतःची ओळख निर्माण केली. ‘काधलर दिनम’ आणि ‘युवा’ यांसारख्या चित्रपटांत लहान भूमिका केल्यानंतर, २००८ मधील तमिळ हिट ‘जयमकोंडान’मुळे तिला खरी ओळख मिळाली.
विशेष म्हणजे, लेखा आणि इमरान यांनी याआधीही एकत्र स्क्रीन शेअर केली होती. ‘मटरू की बिजली का मंडोला’ या चित्रपटात लेखाने इमरानच्या मित्राची कॅमिओ भूमिका साकारली होती. आज मात्र ती इमरानच्या आयुष्यातील सर्वात मोठा आधार ठरली आहे. ‘हॅपी पटेल: खतरनाक जासूस’ या चित्रपटातून इमरान खानने तब्बल १० वर्षांनंतर सिनेसृष्टीत जोरदार कमबॅक केला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘हॅपी पटेल: खतरनाक जासूस’ रिव्ह्यू: अपेक्षा उंचावल्या, पण वीर दासची स्पाई-कॉमेडी ठरली फिकी










