Divorce | बॉलिवूडमधील आणखी एक प्रेमळ जोडप्याच्या नात्यात दुरावा, इमरान खानने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

बॉलिवूड अभिनेता इमरान खान (Imran Khan) बॉलिवूड इंडस्ट्रीपासून बऱ्याच दिवसांपासून दुर आहे. तो शेवटचा २०१५ मध्ये ‘कट्टी बट्टी’ चित्रपटात दिसला होता. इमरान त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. अभिनेत्याने पत्नी अवंतिका मलिकसोबतचे लग्न मोडण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. बऱ्याच दिवसांपासून दोघेही एकमेकांपासून वेगळे राहत आहेत. 

View this post on Instagram

A post shared by Imran Khan (@imrankhan)

इमरान खानचे पत्नी अवंतिका मलिकसोबतचे नाते गेल्या काही वर्षांपासून बिघडत चालले आहे. इतकंच नाही, तर या नात्यात इतका दुरावा आला की, दोघांनीही वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. दीर्घ अफेअरनंतर इमरानने २०११ मध्ये अवंतिकासोबत लग्न केले होते. २०१४ मध्ये या दोघांची मुलगी इमराचा जन्म झाला. मुलीच्या जन्मानंतर त्यांच्या नात्यात थोडी कटुता निर्माण झाली आणि २०१९ मध्ये अवंतिका इमरानला सोडून आई-वडिलांच्या घरी राहायला गेली. (imran khan decides to end his marriage with wife avantika malik)

इमरानचे आर्थिक संकट बनले नात्यातील अंतराचे कारण
बातम्यांनुसार, काम न मिळाल्याने इमरान खान आर्थिक संकटाचा सामना करत होता. आर्थिक संकटामुळे दोघांमध्ये भांडणे सुरू झाली आणि त्याचा परिणाम त्यांच्या मुलीवर होऊ लागला. दोघांच्या कुटुंबीयांनी हे नातं पुन्हा जोडण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. अवंतिका आपल्या मुलीसोबत तिच्या वडिलांच्या घरी राहते.

अवंतिका- रणबीरमध्ये इमरान खानची एन्ट्री
खरं तर, रणबीरची एक गर्लफ्रेंड होती. तिचं नाव होतं अवंतिका मलिक. माध्यमांतील वृत्तांनुसार, अवंतिका जेव्हा ‘जस्ट मोहब्बत’ या टीव्ही मालिकेत काम करत होती, तेव्हा रणबीर तिच्यावर इतका फिदा झाला होता की, नेहमी तो तिला भेटण्यासाठी थेट सेटवर जायचा. दोघांमध्ये चांगली मैत्रीही होती. परंतु यादरम्यान काय झालं कुणास ठाऊक अचानक अवंतिका आणि इमरानचीच लव्हस्टोरी सुरू झाली.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post