Saturday, April 19, 2025
Home कॅलेंडर असं काय झालं की सनीला करावा लागला रिक्षाने प्रवास! वाचा सविस्तर…

असं काय झालं की सनीला करावा लागला रिक्षाने प्रवास! वाचा सविस्तर…

मंडळी मुंबईमधील ट्रॅफिक जॅम हे काही आपल्याला नवीन नाही. अशावेळी एअरपोर्टवर लवकर पोहोचण्यासाठी, बॉलिवूड स्टार्स आपल्याला कधी कधी रिक्षातून तर कधी बाईकवरून प्रवास करताना दिसतात. सलमान खान, टायगर श्रॉफ, श्रद्धा कपूर यांना आपण कधी ना कधी रिक्षामधून प्रवास करताना पाहिलं असेल. यात आता आणखीन एका अभिनेत्रीची भर पडली आहे, ती म्हणॆ सनी लिओनी! सनी लिओनी हीचा ऑटो रिक्षातून प्रवास करतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या ऑटो प्रवास करण्यामागे तीच कारणही तसंच आहे. चला तर मग जाणून घेऊयात सनीच्या या ऑटो प्रवासाबद्दल!

सनीचा रिक्षातून प्रवास करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये सनी आपल्याला रिक्षातून उतरताना दिसतेय. ती जशी रिक्षातून उतरते तिच्यावर अचानक फ्लॅश लाईट्सचा उजेड पडू लागतो. पत्रकारांना कदाचित कळालं असेल त्यामुळे ते आधीच तिच्या गणत्वयस्थानी येऊन राहिले. सनीला फोटोज काढतायत हे कळल्यावर तिने शुद्ध एखादं दुसरी लहानशी पोज कॅमेऱ्यासमोर दिली आणि ती तिच्या मार्गावर पुन्हा परतली. सनीला सोशल मीडियावर ऍक्टिव्ह राहणं खूप आवडतं. ती बऱ्याचदा या सोशल मीडियामुळे ती तिच्या चाहत्यांसोबत गप्पा मारत असते.

आपल्याला ठाऊकच आहे की सनीचं बॉलिवूड पदर्पणच फार वादग्रस्त राहील होत. सनी ही पूर्वी पॉर्न स्टार राहिलेली आहे. यानंतर तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंच. रागिणी एमएमएस २, जिस्म२, एक पहेली लीला, वन नाईट स्टॅण्ड, हेट स्टोरी २ सारख्या सिनेमांमधून सनीने मुख्य भूमिका साकारल्या तर शूट आउट ऍट वडाळा, रईस, बॉईज या सिनेमांमधून तिने आयटम सॉंग केले. जे देखील बरेच यशस्वी ठरले. सध्या सनी ही तीन मुलांची आई आहे तर तिच्या नवऱ्याचं नाव डॅनियल वेबर असून तो पूर्वी अमेरिकेमध्ये गिटार वादक होता परंतु आता तो सनीसाठी बिजनेस मॅनेजर म्हणून काम पाहतोय. आई झाल्यानंतर सुद्धा सनीने फिटनेस कायम ठेवत स्वतःतचा बोल्ड पणा तसाच ठेवला आहे.

हे देखील वाचा