टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक असलेल्या जेनिफर विंगेट त्यांच्या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जातात. सहसा त्या आपल्या प्रोफेशनल कामामुळे चर्चेत असतात, मात्र यावेळी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे त्या चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. अलीकडेच जेनिफर दुसऱ्यांदा लग्नाच्या तयारीत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जेनिफर विंगेट (Jennifer Winget)यांचे नाव लोकप्रिय टीव्ही अभिनेता करण वाहीसोबत जोडले जात आहे. दोघेही लवकरच लग्नबंधनात अडकू शकतात, अशी चर्चा आहे. मात्र, सध्या या बातम्या केवळ अफवांपुरत्याच मर्यादित आहेत. जेनिफर किंवा करण वाही यांच्याकडून याबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.
जेनिफर विंगेट आणि करण वाही नुकतेच वेब शो ‘रायसिंघानी वर्सेस रायसिंघानी’ मध्ये एकत्र दिसले होते. या शोमधील दोघांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडली. त्यांच्या सहज अभिनयामुळे आणि बॉन्डिंगमुळे चाहते दोघांमध्ये मैत्रीपेक्षा काहीतरी अधिक नातं असावं, असा अंदाज लावत आहेत. शूटिंगच्या बाहेरही हे दोघे चांगले मित्र असल्याचं दिसून आलं आहे.
लग्नाच्या चर्चांवर सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी आनंद व्यक्त करत ही बातमी खरी ठरावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे.
जेनिफर विंगेट यांचे वैयक्तिक आयुष्य यापूर्वीही चर्चेत राहिले आहे. त्यांनी 2012 मध्ये अभिनेता करण सिंग ग्रोव्हर यांच्याशी लग्न केले होते. ‘दिल मिल गए’ या लोकप्रिय मालिकेच्या सेटवर दोघांची ओळख झाली होती. मात्र, हे नातं फार काळ टिकू शकलं नाही आणि 2014 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. घटस्फोटानंतर जेनिफर यांनी पूर्णपणे आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित केले.
या चर्चांनंतर मिडियाशी बोलताना करण वाही यांनी या अफवांना साफ नकार दिला. त्यांनी सांगितले, “ही बातमी कुठून आली ते मला माहीत नाही, पण यात काहीही तथ्य नाही.” तसेच त्यांनी इन्स्टाग्राम स्टोरीवरही प्रतिक्रिया देत “फ्री पीआरसाठी धन्यवाद” असे लिहिले.
करण वाही आणि जेनिफर विंगेट यांनी याआधीही ‘दिल मिल गए’ या मालिकेत एकत्र काम केले होते आणि तेव्हापासूनच ते एक लोकप्रिय ऑन-स्क्रीन जोडी म्हणून ओळखले जातात. अलीकडील वेब सीरिजमुळे या चर्चांना पुन्हा उधाण आले असले तरी, सध्या तरी या लग्नाच्या बातम्यांवर अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
अजित पवारांच्या मृत्यूवर पंतप्रधान मोदींचे पहिले वक्तव्य, काय म्हणाले ते घ्या जाणून










