Sunday, June 23, 2024

करण ग्रोव्हरपासूनच्या घटस्फोटावर जेनिफर विंगेटने साेडले मौन; म्हणाली, ‘एक दुर्दैवी वेळ…’

अभिनेत्री जेनिफर विंगेटने टीव्हीच्या दुनियेत स्वत:ची एक खास ओळख निर्माण केली. जेनिफने एकापेक्षा जास्त टीव्ही शोमध्ये काम केले आहे. वयाच्या 12व्या वर्षी अभिनय क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या जेनिफरने अभिनेता करण सिंग ग्रोवरसोबत 2012 मध्ये लग्न केले. मात्र, लग्नाच्या काही वर्षानंतर या जाेडप्याने विभक्त हाेण्याचा निर्णय घेतला आणि दाेघे वेगळे झाले.

अशात घटस्फोटाच्या इतक्या वर्षानंतर जेनिफरने करणसोबतच्या तिच्या नात्याबाबत खुलासा केला आहे. या संबधी माध्यमाशी बाेलताना जेनिफर म्हणाली की, “मला विश्वास आहे की, आम्ही दोघेही यासाठी तयार नव्हतो. केवळ ताे किंवा मी नाही, तर आम्ही दाेघेही ते पाऊल उचलायला तयार नव्हताे. आम्ही इतके दिवस मित्र होतो. आम्ही जेव्हा – केव्हाही भेटायचाे तेव्हा खुप धमाल करायचाे, पण मला वाटते की ती एक दुर्दैवी वेळ होती.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Jennifer Winget (@jenniferwinget1)

जेनिफरने बालकलाकार म्हणून ‘राजा को रानी से प्यार हो गया’ या चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पदार्पण केले, ज्यानंतर जेनिफर ‘दिल मिल गए’, ‘बेहद’, ‘कहीं तो होगा’ आणि ‘बेपन्नह’ यांसारख्या लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये दिसली. जेनिफर विंगेटच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती शेवटची ‘कोड एम सीझन 2’ मध्ये दिसली होती, ज्यामधील तिचा मेजर मोनिका मेहराचा अभिनय चाहत्यांना खूप आवडला होता. पहिल्या सीझनप्रमाणेच दुसऱ्या सीजनमध्येही जेनिफने तिची भूमिका चोख बजावली आहे, जी चाहत्यांच्या चांगलीच पसंतीस उतरली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Jennifer Winget (@jenniferwinget1)

दुसरीकडे करण सिंग ग्राेवर विषयी बाेलायचे झाले, तर त्याने बिपाशा बसूशी लग्न केले आहे. अशात दाेघेही वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहेत. महत्वाचे म्हणजे लग्नाच्या 7 वर्षानंतर या जाेडप्याला मुलगी झाली, ज्यामुळे हे जाेडपे खुप मजा करत आहे, तर जेनिफर तिच्या सिंगल लाईफमध्ये खूप आनंदी आहे.(Tv actress jennifer winget reveals in latest interview about her divorce with karan singh grover)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
सुंबुलवर काेसळला दु:खाचा डाेंगर; अभिनेत्री हंबरडा फाेडत म्हणाली, ‘तू नेहमी माझ्या हृदयात राहशील’

‘प्रत्येक दिवस मधुचंद्रासारखा आहे’, वैवाहिक जीवनाबद्दल काय बोलली दलजीत कौर? एकदा वाचाच

हे देखील वाचा