Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘आपल्या जिभेसाठी नव्हे, तर…’, अभिनेते मिलिंद सोमण यांनी शर्टलेस फोटो शेअर करून सांगितले अन्नाचे महत्त्व

बॉलिवूड अभिनेते आणि मॉडेल मिलिंद सोमण नेहमीच आपल्या फिटनेसमुळे चर्चेचा विषय ठरत असतात. ते नेहमी सोशल मीडियावर व्यायाम करतानाचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करतात. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ असे असतात, जे काही क्षणातच व्हायरल होऊ लागतात. अशातच आता त्यांनी अन्नाचे महत्त्व सांगताना एक फोटो शेअर केला आहे. तोही व्हायरल होतोय.

मिलिंद सोमण यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या फोटोत, ते आपल्या पत्नीसोबत दिसत आहेत. यादरम्यान त्यांनी आपल्या चाहत्यांना अन्नाचे महत्त्व सांगितले आहे. याव्यतिरिक्त ते फोटोमध्ये शर्टलेस दिसत असून कलिंगड खाताना दिसत आहेत. त्यांच्या मागे त्यांची पत्नी अंकिताही आंबे खाताना दिसत आहे.

हा फोटो शेअर करत त्यांनी चाहत्यांनी अन्नासाठी महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत. त्यांनी लिहिले की, “देवतांचे भोजन, जसे हिप्पोक्रेट्सने २००० वर्षांपूर्वी सांगितले होते आणि आयुर्वेदाने एक हजार वर्षांपूर्वी सांगितले होते की अन्न हेच औषध आणि औषध हेच अन्न आहे.

पुढे त्यांनी लिहिले की, “आपण काय, केव्हा आणि किती खात आहात हे सुज्ञतेने निवडा… केवळ आपल्या जिभेसाठी नव्हे तर चांगल्या मनासाठी, शरीरासाठी आणि आत्म्यासाठी खा.

अभिनेते मिलिंद यांच्या या पोस्टला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. फोटोला आतापर्यंत ३० हजारांपेक्षाही अधिक लाईक्स मिळाले आहेत. सोबतच शेकडो कमेंट्सही मिळत आहेत. अभिषेक आशा मिश्राने कमेंट करत लिहिले की, “शेवटी इथेही आंबेच आहेत. जेवण करा मनोरंजन नका करू.” दुसऱ्या एका चाहत्याने कमेटं करत लिहिले की, “उन्हाळ्यात आंबे हे स्वर्ग आहे.” आणखी एका चाहत्याने कमेंट केली की, “नाश्तामध्ये फळे खावा, ते डॉक्टरांना दूर ठेवतात.”

नुकतेच त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये त्यांनी एका महिलेला पुश- अप्स मारायला सांगितले होते. त्यांनी व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले होते की, “सेल्फी घेणाऱ्यांसाठी माझे सर्वात आवडते पुश- अप्सपैकी एक. मी एका लहानशा बाजारातील गल्लीत होतो. मला वाटते कदाचित, रायपूर होते. तिथे स्थानिक लोक अनेक गोष्टी खात होते आणि या महिलेने मला सेल्फी मागितली.”

पुढे त्यांनी लिहिले की, “दरम्यान, एका महिलेने मला सेल्फीसाठी विचारले. मी 10 पुशअप्स म्हणताच, ती जमिनीवर होती आणि मी माझा कॅमेरा चालू करण्यापूर्वीच तिने पुशअप्स मारण्यास सुरुवात केली. ना साडीचा त्रास, ना आजूबाजूच्या लोकांची समस्या किंवा तिने कधीही पुश-अप केले नाही, याचीही चिंता नाही.”

हे देखील वाचा