Thursday, April 23, 2026
Home साऊथ सिनेमा ‘द राजा साब’ हा चित्रपट ओटीटीवर हिंदीमध्ये झाला प्रदर्शित; चित्रपट कुठे प्रदर्शित झालाय, ते घ्या जाणून

‘द राजा साब’ हा चित्रपट ओटीटीवर हिंदीमध्ये झाला प्रदर्शित; चित्रपट कुठे प्रदर्शित झालाय, ते घ्या जाणून

प्रभास लोकप्रिय अभिनेता आहे. तो नेहमीच त्याच्या चित्रपट संबंधी चर्चेत असतो, तर काहीच दिवसाखाली त्यांचा चित्रपट “द राजा साब” हा प्रदर्शित झाला. मात्र तो थेटर मध्ये जास्त दिवस टिकला नाही. द राजा साब बजेटच्या अर्ध्याही रकमेची वसुली केली नाही. तर निर्मात्यांनी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला. याआधी तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम या भाषेत जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित झाला होता. मात्र  हिंदी भाषेत प्रदर्शित झाला नव्हता, पण आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर हिंदीमध्ये प्रदर्शित झाला आहे.

“द राजा साब” या  चित्रपटात प्रभास, संजय दत्त, निधी अग्रवाल, मालविका मोहनन, रिद्धी कुमार आणि बोमन इराणी हे कलाकार आहेत. तर हा चित्रपट 6 मार्च 2026 रोजी जिओ हॉटस्टारवर हिंदीमध्ये प्रदर्शित झाला. चित्रपटाचा एक जबरदस्त व्हिडिओ शेअर करताना निर्मात्यांनी लिहिले की, “राजवाड्याचे दरवाजे उघडले आहेत, जुनी गुपितेही उघड होत आहेत. प्रभासचा (Prabhas)नवीनतम हॉरर-कॉमेडी, द राजा साब पहा, जो आता जिओ हॉटस्टारवर प्रसारित होत आहे.

चित्रपटाचे बजेट अंदाजे 400 कोटी होते, परंतु त्याने फक्त 205 कोटींची कमाई केली. परिणामी, प्रभासचा “द राजा साब” हा चित्रपट 2026 मधील सर्वात मोठा आपत्ती ठरला आणि बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. IMDb वर त्याचे रेटिंग देखील 3.4 आहे. आता प्रभास लवकरच “स्पिरिट” या चित्रपटात दिसणार आहे, जो 5 मार्च 2027 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या चित्रपटात तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

या अभिनेत्याने 500 हून अधिक चित्रपटांमध्ये केले काम, तर 71 व्या वर्षीही दिसतात फिट्ट

हे देखील वाचा