अक्षय खन्ना हा बॉलीवूड स्टार आहे. तर धुरंधर 2 आता प्रचंड गाजत असला तरी, धुरंधरमध्ये अक्षय खन्नाने उत्तम अभिनय करून प्रेक्षकांचे मन जिंकले. तसेच त्यातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. त्यामुळे अक्षय खन्नाची भूमिका अजून उठून दिसली. तसेच धुरंधरमध्ये त्याने विलनची भूमिका साकारली होती, मात्र तरीही त्या भूमिकेला प्रचंड प्रेम मिळाले. त्याने आतापर्यत अनेक उत्तम चित्रपट चित्रपटसृष्टीला दिले आहेत. तर तो नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतो. तर या दरम्यान, अक्षय खन्नाचा (Khnna)ऑन-स्क्रीन भाऊ, दानिश पंडोर, जो उझैर बलोच म्हणूनही ओळखला जातो, त्याने सेटवर त्याचा अनुभव कसा असतो हे सांगितले आहे.
दानिश पंडोरने एका दिलेल्या मुलाखतीत सांगितले, “तो एक व्यक्ती म्हणून खूप मनमिळाऊ आणि मैत्रीपूर्ण आहे, आणि जरी तो जास्त बोलत नसला तरी, तुम्ही त्याला काहीही विचारल्यास तो अगदी स्पष्टपणे उत्तर देतो. होय, असे असायचे म्हणजे काहीहि काम असेल त्याने कधीच नकार दिला नाही. जेव्हा तो चित्रपटाच्या सेटवर असतो, तेव्हा तो स्वतःच्याच विश्वात हरवून जातो. ‘धुरंधर’च्या सेटवर तो आपल्या भूमिकेवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करत असे आणि जेव्हा कॅमेरा सुरू व्हायचा, तेव्हा तो त्या भूमिकेत पूर्णपणे रमून जायचा.
दानिश पंडोरने अक्षयच्या कार्यशैलीबद्दल एक रंजक गोष्टही उघड केली. मात्र, त्याला अक्षय खन्नासोबत संवाद साधणे अवघड नव्हते. तो म्हणा, तो सेटवर फोन घेऊनसुद्धा बसत नाही. तो एका कोपऱ्यात शांतपणे बसतो आणि कोणी विचारल्याशिवाय कोणाशीही बोलत नाही. तो खूप चांगला माणूस आहे. तो शांतपणे बसतो, स्वतःच्याच विश्वात रमतो आणि आपल्या अभिनयाचा विचार करतो.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










