आकांक्षा चमोला आणि गौरव खन्ना यांचे नाते गेल्या काही महिन्यांपासुन चर्चेत आहे. नेटफ्लिक्सवरील लाॅक अप 2 या शोमध्ये हजेरी लावताना आकांक्षाने खुलासा केला होता की, ती आणि गौरव खन्ना जवळपास एक वर्षापासुन वेगळे राहत होते आणि घटस्फोट घेण्याचा विचार करत होते. आकांक्षाने या शोमध्ये स्वत: बद्दल इतरही अनेक खुलासे केले. दरम्यान, आता आकांक्षा चमोलाने पुन्हा एकदा सोशल मिडीयावर नेटकऱ्याचे लक्ष वेधुन घेतले आहे. तर सध्या अभिनेत्रीने इन्साग्रामवर गौरव खन्नाला अनफॅालो केले आहे आणि त्याचे एकत्र असलेले फोटो त्यांनी डिलीट केले आहेत. मात्र गौरव खन्ना अजुनही आकांक्षाला फॅालो करतो. आणि त्या दोघांचे फोटो अजुनही कायम आहेत.
तर त्याच्या घटस्फोटाच्या अफवा सुरुच आहेत. आणि या दरम्यान आकांक्षा चमोलाने गौरव खन्नाला अनफॅालो केले आहे. तसेच त्या दोघांचे फोटो सुध्दा तीने आकांटवरुन डिलिट केले आहेत. तर आकांक्षाच्या या प्रकारावर चाहत्यांना धक्का बसला आहे. तसेच आकांक्षाने काहि दिवसांपुर्वी गौरव कडे 10 कोटी रुपयांची पोटगीची मागणी केल्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे. तिने हे दावे स्पष्ट नाकारले आहे.
आकांक्षाने एका रियालिटी शोमध्ये गौरव (gaurav)खन्नापासुन विभक्त झाल्याची घोषणा केल्यामुळे तिच्यावर अनेकांनी टिका केली की, हे सर्व तिने प्रेसिध्दी मिळवण्यासाठी केले आहे. मात्र तिने एका मुलाखती दरम्यान म्हणले की, मी हे केले कारण तो एक शोचा भाग असल्याने सांगावे लागले आणि खोट सांगण्यापेक्षा जे खरे आहे तेच मी सांगितले आहे.
हेही वाचा
अरिजित सिंग-श्रेया घोषालच्या सुरांनी सजलं जय जय राम, रणबीर कपुरच्या रामायण मधील पहिलं गाणं रिलीज










