Saturday, January 31, 2026
Home मराठी ‘बाई बाई, किती भारी या सईबाई!’ ‘माझा होशील ना’च्या सेटवर चांगलाच रंगला क्रिकेट सामना

‘बाई बाई, किती भारी या सईबाई!’ ‘माझा होशील ना’च्या सेटवर चांगलाच रंगला क्रिकेट सामना

टीव्हीवरील लोकप्रिय मालिकेंपैकी एक मालिका आहे, ‘माझा होशील ना’. ही मालिका सुरू झाल्यापासूनच रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. यातील सई आणि आदित्यची प्रेमकथा प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. अर्थातच गौतमी देशपांडे आणि विराजस कुलकर्णी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली आहे. यातील कलाकारांनी देखील अगदी कमी कालावधीत आपली खास ओळख निर्माण केली आहे. आता या मालिकेच्या सेटवरील एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चा रंगवत आहे.

खरं तर, झी मराठी चॅनलच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गौतमी हिरव्यागार मैदानावर क्रिकेट खेळत आहे. यात ती तिच्या सहकलाकारांसोबत अतिशय मस्त अंदाजात क्रिकेटचा आनंद घेत आहे.

या व्हिडिओच्या खाली कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “बाई बाई बाई बाई किती भारी या सईबाई. शूटिंग दरम्यान सईबाईंचा रंगला क्रिकेट सामना.” अगदी काही तासांतच या व्हिडिओ तब्बल ४४ हजाराहून अधिक व्ह्यूज आले आहेत. तसेच गौतमीचे चाहते तिचा खेळ पाहून, कमेंट बॉक्समध्ये तिला ‘बहुप्रतिभावान’ म्हणत आहेत. यावरून नेटकऱ्यांना हा व्हिडिओ आवडल्याचे सहज लक्षात येत आहे.

गौतमीबद्दल बोलायचे झाले तर ती अभिनेत्रीसोबत गायिकाही आहे. ती प्रसिद्ध अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची बहीण आहे. तिने २०१८ साली सोनी मराठी चॅनलवरील ‘सारे तुझ्याच साठी’ या मालिकेद्वारे टीव्हीवर पदर्पण केले होते. त्यानंतर ती आता ‘माझा होशील ना’ या प्रसिद्ध टीव्ही मालिकेमध्ये काम करत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा