बॉलिवूडमधील रोमँटिक आणि क्यूट अभिनेता म्हणजे शाहिद कपूर. त्याच्या चाहत्यांना त्याच्या अंदाजाने आणि स्टाईलने दीवाना बनवण्याची एकही संधी तो सोडत नाही. त्याने ऍक्शन आणि गंभीर रोल देखील निभावले आहे, पण त्याचा रोमँटिक अंदाज प्रेक्षकांना जास्त भावला. चित्रपटात शाहिद जेवढे रोमँटिक पात्र निभावतो, तेवढाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात देखील रोमँटिक आहे. शाहिद त्याची पत्नी मीरावर खूप प्रेम करतो. नुकतेच शाहिदने मीराला सरप्राइज देण्यासाठी फुलांचा गुच्छ भेट दिला आहे. पतीकडून मिळालेल्या या अनपेक्षित सरप्राइजने मीरा खूप खुश झाली. तिने या क्षणाचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. तिने हे फोटो शेअर करून लिहिले आहे की, “अशाप्रकारे तू माझं मन चोरतो. शाहिद कपूर मी तुझ्यावर खूप प्रेम करते.”
मीराने शेअर केलेल्या या फोटोवर नेटकरी खूप प्रेम दर्शवत आहे. सगळ्यांना त्यांचा हा अंदाज खूप आवडला आहे. अनेकजण या फोटोवर प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट करून लिहिले आहे की, “तू खूप नशीबवान आहे.” तर दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे की, “हे खूपच रोमँटिक आहे.” एका युजरने लिहिले आहे की, “शाहिद तू खूप छान आहे.”
अनेकजण असं म्हणतात की, लग्नानंतर प्रेम कमी होते पण शाहिद कपूरने हे असे सरप्राइज देऊन ही गोष्ट चुकीची सिद्ध केली आहे. हे सरप्राइज देताना तो म्हणाला की, “पत्नीला खुश करणे एवढे पण अवघड नाहीये. तुमच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या तुमच्या बायकोला फक्त तुमचा मौल्यवान वेळ पाहिजे असतो. तुम्हाला तिला खुश करण्यासाठी डायमंड सेटची गरज नाही. फुलांनी देखील ते काम होऊन जातं.”
शाहिद कपूर आणि मीराचे अरेंज मॅरेज आहे. मीरा शाहिद पेक्षा १३ वर्षांनी लहान आहे. परंतु त्यांच्या प्रेमात आणि समंजसपणामध्ये हा वयाचा फरक दिसून येत आहे. शाहिद कपूरसोबत लग्न करून मीरा स्वतः ला खूप भाग्यवान समजते. तर शाहिदचे देखील असे म्हणणे आहे की, कमी वयात देखील मीराने घरातील सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…










