Wednesday, July 2, 2025
Home मराठी कोण आहे हा अभिनेता? एकेकाळी रामायणात ‘लव’ची भूमिका साकारणारा, आज आहे चित्रपटसृष्टीचा आघाडी कलाकार

कोण आहे हा अभिनेता? एकेकाळी रामायणात ‘लव’ची भूमिका साकारणारा, आज आहे चित्रपटसृष्टीचा आघाडी कलाकार

सामान्य व्यक्ती असो वा प्रसिद्ध कलाकार, प्रत्येकाला आपलं बालपण खूप प्रिय असतं. आपण मोठे झाल्यानंतर लहानपणीच्या फक्त आठवणी आपल्या सोबत राहतात. या खास आणि गोड आठवणी आपण फोटोंच्या माध्यमातून आपल्या जवळ बांधून ठेवतो. आपण बऱ्याचदा पाहतो, की कलाकारवर्ग या लहानपणीच्या गोड आठवणी आपल्या चाहत्यांसोबत शेअर करतात. असाच एक गोड फोटो पुन्हा चाहत्यांसमोर आला आहे. ज्याला नेटकऱ्यांचे खूप प्रेम मिळत आहे.

हा फोटो आहे, मराठी सिनेसृष्टीच्या ‘चॉकलेट बॉय’चा! अर्थातच अभिनेता स्वप्नील जोशी याचा. त्याने नुकताच त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे, जो वेगाने सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मध्ये स्वप्नील रामायणातील लवच्या वेशात दिसत आहे. हा फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “लहानपणी मी पाहिलेलं मोठ्ठं स्वप्न होतं अभिनेता बनायचं.”

गेल्यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता सगळीकडे लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. त्यावेळी सर्वजण आपापल्या घरी आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत होते. तेव्हा प्रेक्षकांच्या मागणीवरून सरकारने ‘रामायण’ पुन्हा एकदा टीव्हीवर प्रसारित करण्याचा निर्णय घेतला होता. एवढेच नव्हे, तर रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ने टीआरपीचे सर्व रेकॉर्ड्स मोडले होते. त्याचप्रमाणे यावर्षीही प्रेक्षकांसाठी पुन्हा एकदा ‘रामायण’ टीव्हीवर दाखवले गेले. गेल्यावर्षीपासून ‘रामायण’ सोबतच त्यातील कलाकार देखील प्रकाशझोतात आले आहेत.

अभिनेता स्वप्नील जोशीने देखील बालकलाकार म्हणून रामायणमध्ये लवची भूमिका साकारली होती. जी प्रेक्षकांकडून चांगलीच पसंत केली होती. तो आता सिनेसृष्टीत नावाजलेला आणि आघाडीचा अभिनेता आहे. त्याचे चित्रपट आणि त्याच्या व्यक्तीरेखा चाहत्यांकडून चांगल्याच पसंत केला जातात. त्याने ‘चेकमेट’, ‘आम्ही सातपुते’, ‘दुनियादारी’, ‘मितवा’, ‘भिकारी’ या हिट चित्रपटांमध्ये दिसला आहे. अलीकडेच स्वप्नील ‘बळी’ चित्रपटात झळकला होता.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर

हेही नक्की वाचा-
‘नाे शेम मूव्हमेंट’ ला साराने केला सपाेर्ट; म्हणाली, ‘मुली घाबरुन किंवा स्व:ताच्या…’
काेण हाेता राहुल? ज्याने ऐन लग्नाच्यावेळी वैशालीला आत्म’हत्या करण्यास भाग पाडले

हे देखील वाचा