काेण हाेता राहुल? ज्याने ऐन लग्नाच्यावेळी वैशालीला आत्म’हत्या करण्यास भाग पाडले

0
55
vaishali-thakkar

टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्कर हिने रविवारी (दि. 16 ऑक्टाेबर)ला दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी राहुल नवलानी आणि त्याची पत्नी दिशा यांच्या दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दोघेही वैशालीच्या शेजारी राहणारे आहेत. आत्महत्ये आधी वैशालीने पाच पानांची सुसाईड नोट लिहिली असून त्यात राहुलचे नाव आहे. अभिनेत्रीने त्याच्यावर छळ आणि शोषणाचा आरोपही केला होता.

मीडियाशी बोलताना वैशालीच्या भावाने सांगितले की, “तो त्याच्या बहिणीला धमकावत असे.” राहुल (rahul navlani) याचे वडील इंदूरमध्ये प्लायवूडचा व्यवसाय करतात. राहुलने कॉलेजचे शिक्षण घेतलेले नसून तो एक फर्म चालवतो. वैशाली (vaishali thakkar) हिचे कुटुंब राहत असलेल्या सोसायटीत राहुल हा 10-12 वर्षांपासून राहत होता. वैशालीचा भाऊ नीरज ठक्कर यांनी सांगितले की, “कोरोना महामारीच्या काळात वैशाली मुंबईहून इंदूरला परतली, तेव्हा ती राहुलच्या संपर्कात आली. दोघे अनेकदा जिममध्ये भेटायचे.”

नीरजने पुढे सांगितले की, “तो तिला अनेकदा धमकावत होता की, मी तुला कधीच संसार थाटू देणार नाही. लग्न हाेऊ देणार नाही.” वैशालीने डायरीत सर्व नातेसंबंध विषयी लिहिले होते. वैशालीचे ज्या मुलाशी लग्न हाेणार हाेते त्या मुलाला राहुल मॅसेज करत असे आणि वैशालीला धमकावत असे. तिच्या लग्नाच्या तयारित देखील ताे वैशालीला धमकावत असे. या सगळ्याला वैशाली कंटाळली होती.

राहुल सध्या घरी नसून त्याच्या घराला कुलूप असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलीस राहुलचा शोध घेत आहेत. एसीपी मोती उर रहमान यांनी एएनआयला सांगितले की, “राहुल हा वैशालीचा शेजारी आहे. तो वैशालीचा छळ करत असल्याचं सुसाईड नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामुळेच तिने एवढं मोठं पाऊल उचललं.” पोलिसांनी सांगितले की, “वैशालीचे लग्न दुसऱ्या कोणाशी तरी होणार होते, ज्याच्याबद्दल राहुल तिला त्रास देत होता. याला कंटाळून तिने आत्महत्या केली.”

वैशाली ठक्कर प्रसिद्ध शो ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मध्ये संजनाची भूमिका साकारताना दिसली आहे. या शोमधून तिला बरीच ओळखही मिळाली. या शोनंतर ती ‘ये वादा रहा’, ‘ये है आशिकी’, ‘ससुराल सिमर का’, ‘सुपर सिस्टर’, ‘लाल इश्क’ मध्ये दिसली हाेती.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक कर
हेही वाचा-
‘गर्दीतून वाट काढताना अचानक अमोलभाऊ अशी हाक कानावर येते’, अमोल कोल्हेंच्या पोस्टवर होतोय कौतुकाचा वर्षाव

‘हँडसम हंक’ कुणाल कपूर आणि बच्चन घराण्यात नक्की नातं आहे तरी काय?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here