सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची लाडकी लेक अभिनेत्री श्रिया पिळगावकरने अगदी कमी वयात खूप नाव कमावले आहे. अल्पावधीतच तिने चाहत्यांच्या हृदयात आपले खास स्थान निर्माण केले आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी ती सतत सोशल मीडियाद्वारे पोस्ट शेअर करत राहते. आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल शेअर करून, ती अपडेट देत राहते. इतकेच नव्हे, तर तिच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित घडामोडी व तिच्या आवडीनिवडी देखील ती चाहत्यांसोबत शेअर करत आहे.
श्रियाला नवनवीन गोष्टी शिकणे खूप आवडते. तिची ही जिज्ञासू वृत्ती अनेकदा आपल्याला पाहायला मिळाली आहे. तिचा नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात अभिनेत्री चक्क मातीची भांडी घडवताना दिसत आहे. होय, श्रियाने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ती कुंभाराच्या चाकावर मातीची भांडी बनवत आहे.
तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, तिचे हात पूर्ण मातीने भरलेले आहेत. यात एका प्रशिक्षकाच्या मदतीने श्रिया मातीची भांडी बनवायला शिकताना दिसत आहे. इतकेच नव्हे, तर ती योग्यरीत्या त्या भांड्याला आकारही देत आहे.
हा व्हिडिओ शेअर करत, श्रिया कॅप्शनमध्ये म्हणतेय की, “नवीन कौशल्य शिकण्याचा आनंद. कुंभाराच्या चाकावर हात घाण करण्यापेक्षा मस्त गोष्ट नाही. आपल्या सुंदर स्टुडिओमध्ये मला भेट दिल्याबद्दल @pattterned_studio धन्यवाद.” यावर आता चाहत्यांच्या जोरदार प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. हा व्हिडिओ पाहून नेटकरीही तिच्या जिज्ञासू वृत्तीचे कौतुक करत आहेत.
कामाबद्दल बोलायचे झाले, तर श्रिया लवकरच ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती ‘अरुंधती’चे पात्र साकारणार आहे, जी एक पत्रकार असते. यात तिच्यासोबत पुलकित सम्राट, झोया हुसेन आणि राणा दुग्गाबत्ती मुख्य भूमिकेत दिसतील. तसेच चित्रपट तेलगू भाषेत ‘अरण्य’ म्हणून, तर तमिळमध्ये ‘कदान’ म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-जेव्हा कृष्णा अभिषेकने घेतले होते अनिल कपूरचे रूप; पाहून लोटपोट झाली होती सोनम कपूर
-‘तूच माझ्या जगण्याचा आधार’, सपना चौधरीच्या सुंदर व्हिडिओवर चाहत्याची प्रेमळ कमेंट