Saturday, September 30, 2023

जेव्हा कृष्णा अभिषेकने घेतले होते अनिल कपूरचे रूप; पाहून लोटपोट झाली होती सोनम कपूर

प्रेक्षकांना खदखदून हसायला भाग पाडणारा छोट्या पडद्यावरील सर्वात प्रसिद्ध शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो’ होय. या शोमध्ये कोणताही कलाकार आल्यावर चांगलीच धमाल पाहायला मिळते. यातील विनोदी कलाकार तर आपल्या अप्रतिम विनोदाने समोरच्याला हसण्यास भाग पाडतात. इतकेच नव्हे, तर त्यांचा विनोद पाहून प्रत्येकाचे गाल दुखल्याशिवाय राहत नाहीत, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. असेच काहीसे बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरसोबत झाले होते.

अनिल कपूर यांच्या गेटअपमध्ये कृष्णा अभिषेकला पाहून सोनम कपूर झाली होती लोटपोट
‘द कपिल शर्मा शो’मधील एका एपिसोडमध्ये सोनम कपूर पाहुणी म्हणून पोहोचली होती. शोमध्ये सर्वकाही योजनेनुसार चालू होते. त्याचवेळी स्टेजवर अनिल कपूर यांच्या गेटअपमध्ये कृष्णा अभिषेकची एंट्री होते. जेव्हा सोनमची नजर त्याच्यावर पडली, तेव्हा ती जोरजोरात हसून लोटपोट झाली होती. यानंतर स्टेजवर जोरदार मजा- मस्ती पाहायला मिळाली.

कृष्णा अभिषेक करतो जबरदस्त मिमिक्री
एखाद्या कलाकाराची मिमिक्री करण्याची कृष्णा अभिषेकची ही पहिलीच वेळ नाही. तो नेहमीपासूनच एक जबरदस्त मिमिक्री आर्टिस्ट आहे. अनिल कपूर, जीतेंद्र, धर्मेंद्र किंवा जॅकी श्रॉफ यांसारखे कोणतेही कलाकार असो, तो नेहमीच त्यांची अप्रतिम मिमिक्री करत प्रेक्षकांना हसायला भाग पाडतो.

सोनमने नुकताच साजरा केला वाढदिवस
सोनमने नुकताच ९ जून रोजी आपला ३६ वा वाढदिवस साजरा केला. यानिमित्ताने अनिल कपूर यांनी तिचा लहानपणीचा गोड फोटो शेअर करत भावुक पोस्ट लिहिली होती. यावर सोनमनेही कमेंट केली होती.

सध्या शो ऑफ एअर आहे आणि प्रेक्षकांसोबतच शोमधील कलाकारांनाही पुनरागमन करायचे आहे. असे म्हटले जात आहे की, जुलै महिन्यात शोचे पुनरागमन होऊ शकते. यामुळे चाहत्यांमधील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘तूच माझ्या जगण्याचा आधार’, सपना चौधरीच्या सुंदर व्हिडिओवर चाहत्याची प्रेमळ कमेंट

-‘इंडियन आयडल १२’मध्ये ‘मेरे रश्के कमर’ गाणं गायल्याने सोनू कक्कर ट्रोल; युजर्स म्हणाले, ‘मूळ गाण्याची…’

-या चिमुकलीला ओळखलं का? आज तिच्या ‘कॉमिक टायमिंग’साठी आहे प्रसिद्ध; तर प्रेक्षकांना पोट धरून हसायला पाडते भाग

हे देखील वाचा