बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे नेहमी कोणत्या ना कोणत्या बाबतीत ते चर्चेत असतातच. अमिताभ हे नेहमी त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर ऍक्टिव्ह असतात. ते कितीही व्यस्त असले तर ते त्यांचे सोशल मीडिया अकाऊंट अपडेट केल्याशिवाय आणि त्यावर काही पोस्ट केल्याशिवाय राहत नाही. ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ब्लॉग यावर ते जास्त सक्रिय आहेत.
काही दिवसांपूर्वी अमिताभ यांनी त्यांच्या रियालिटी शोमध्ये सुद्धा सांगितले होते की, रात्री कितीही उशीर झाला तरी ते ब्लॉग लिहिल्याशिवाय झोपत नाही. त्यांनी स्वतःला ती सवय लावून घेतली आहे. ते नेहमी त्याचे अनुभव, मत, कविता, इतर अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेयर करत असतात.
आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ते नेहमी फॅन्सच्या संपर्कात असतात. फॅन्सच्या प्रश्नांना उत्तरं देखील ते देतात.
नुकतीच त्यांनी त्यांच्या अकाऊंटवरून एक कविता पोस्ट केली आहे. चहाशी संबंधित असलेली ही कविता त्यांनी त्यांच्या अकाऊंटवरून पोस्ट केली असून त्या कवितेवर चोरीचा आरोप केला गेला आहे. अमिताभ यांनी पोस्ट केलेल्या या कवितेवर टीशा अग्रवाल या महिलेने चोरीचा आरोप लावत ती कविता तिची असल्याचे सांगितले आहे. तिने तिच्या या कवितेला अमिताभ यांनी क्रेडिट द्यायला पाहिजे होते असे सांगितले आहे.
तिने अमिताभ यांची पोस्ट रिपोस्ट करत ‘सर तुमच्या वॉलवर असलेल्या या माझ्या कवितेला माझे नाव देऊन तुम्ही क्रेडिट दिले असते तर मी सुद्धा खुश झाली असती.’ अशी कमेंट तिने केली आहे.
https://www.facebook.com/tisha.agarwal.391/posts/762522077676784
टीशा अग्रवाल एक कवयित्री आहे आणि त्या नेहमी फेसबुकवर त्यांच्या कविता पोस्ट करत असतात. या कवितेला त्यांनी २४ एप्रिल २०२० मध्ये फेसबुकवर पोस्ट केले होते. याबाबत अमिताभ यांच्याकडून अजूनपर्यंत कोणतीच प्रतिक्रिया आली नाहीये.
अमिताभ हे नुकतेच फोर्ब्सच्या यादीत देखील सामील झाले असून ते लवकरच अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणबीर कपूर सोबत दिसणार आहे.










