‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम रुचिरा जाधव सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इतकेच नव्हे, तर तिचे वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ इंटरनेट बऱ्याचदा व्हायरल देखील होतात. चाहतेही तिच्या पोस्ट्सला भरभरून प्रेम देत असतात. तिच्या चाहत्यांमध्ये सर्वाधिक तरुण मंडळी आहे, जे तिच्यावर खूप प्रेम करतात. नुकतंच अभिनेत्रीने तिला कसा मुलगा हवाय याबद्दल सांगितलं आहे.
रुचिरा जाधवने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात रुचिरा तिच्या स्वप्नातला राजकुमार कसा आहे, याबद्दल सांगत आहे. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल, की तिला नेमका कसा मुलगा हवाय? तर रुचिराला ‘बाहुबली’ सारखा मुलगा हवा आहे. होय! रुचिराला तिच्या स्वप्नातला राजकुमार अगदी अमरेंद्र बाहुबली सारखा हवा आहे.
रुचिराने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये ती अभिनेता प्रभासने साकारलेल्या ‘बाहुबली’ या व्यक्तीरेखेवर प्रेम व्यक्त करताना दिसली आहे. सोबतच तिने सांगितले आहे की, “मनासारखा म्हणजे असा हवाय.” हा व्हिडिओ नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे. लाईक्सचा पाऊस पडत असून, यावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
रुचिकाच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर ती ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मालिकेत झळकली होती. यात तिने मायाची भूमिका साकारली होती, जिचे खूप कौतुक करण्यात आले होते. तिने ‘तुझ्यावाचून करमेना’ या मालिकेतून टीव्हीवर पदार्पण केले होते. ‘बे दुणे दहा’, ‘माझे पती सौभाग्यवती’, ‘प्रेम हे’ यासारख्या अनेक मालिकांमध्येही रुचिका दिसली आहे. शिवाय तिने ‘लव लफडे’, ‘सोबत’ या चित्रपटामध्ये देखील काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-गायिका बिली ईलिशला आशियायी लोकांची खिल्ली उडवणे पडले महागात; पोस्ट शेअर करत मागावी लागली माफी
-‘पाऊस, निसर्ग आणि मी…’, म्हणत चिखलात चालताना दिसली मराठमोळी प्राजक्ता माळी