गायिका बिली ईलिशला आशियायी लोकांची खिल्ली उडवणे पडले महागात; पोस्ट शेअर करत मागावी लागली माफी


हिंदीमध्ये एक म्हण आहे ‘गडे मुर्दे उखडना’. आता तुम्ही म्हणाल या म्हणीच्या इथे काय संबंध? संबंध आहे, जिथे सोशल मीडिया आहे तिथे सर्व काही शक्य आहे. आजच्या या सोशल मीडियाच्या काळात सेलिब्रिटीच्या संबंधित अनेक जुन्या नव्या बातम्या, त्यांचे वाद, त्यांचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. याला बॉलिवूड, हॉलिवूडचे कोणतेच कलाकार अपवाद नाही.

मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अमेरिकेची प्रसिद्ध आणि लोकप्रिय सिंगर असलेल्या बिली ईलिशचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये बिली ईलिश आशियाई लोकांबद्दल आपत्तीजनक बोलताना दिसत आहे. मात्र हा व्हिडिओ खूप जुना असून तो एडिटेड आहे. तरीही बिलीला या व्हिडिओसाठी माफी मागावी लागली आहे. तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक माफीनामा पोस्ट केला आहे.

बिलीने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ” मी तुमच्या सर्वांवर खूप प्रेम करते. मागच्या अनेक दिवसांपासून मला खूप लोकं या व्हिडिओबद्दल विचारत आहे, बोलत आहे. मात्र माझे नाव अशा गोष्टीसोबत जोडले जात आहे, ज्याच्याशी माझा संबंध नाही. एक एडिटेड व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, हा व्हिडिओ मी १३/१४ वर्षाची असतानाचा आहे. यात मी एका गाण्यातील शब्दाचा वापर केला होता. तेव्हा मला या शब्दाचा अर्थ माहित नव्हता. त्याआधी मी किंवा माझ्या परिवाराने हा शब्द कधीच ऐकला नव्हता. पण मला माहित आहे की, माझ्या त्या शब्दामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. मी त्या सर्वांची माफी मागते.”

बिलीने पुढे म्हटले की, “या व्हिडिओमध्ये मी विचित्र आवाज काढला आहे. मी लहानपणापासून माझे पेंट्स, मित्र, कुटुंब यांच्याशी अशाच आवाज काढून बोलते. मी यात कोणाचीही कॉपी केली नाही, ना ही कोणाचा खिल्ली उडवली आहे. मला ओळखणाऱ्या सर्व लोकांना माहित आहे की मी असा आवाज कढत असते.”

या मेसेजच्या शेवटी तिने लिहिले की, “मी माझ्या प्लॅटफॉर्मचा वापर करून समानतेसाठी लोकांमध्ये जागरूकता पसरवण्याचा प्रयत्न करत असते. हे वाचण्यासाठी तुम्ही दिलेल्या वेळाबद्दल धन्यवाद.”

तत्पूर्वी, बिलीने वयाच्या चौथ्या वर्षी पहिले गाणे लिहिले होते. तर वयाच्या ८ व्या वर्षी तिने म्युझिक टॅलेंट शोमध्ये सहभाग घेतला होता. बिली जेम्स बॉन्ड सीरिजचे थीम सॉन्ग लिहिणारी आणि गाणारी सर्वात कमी वयाची गायिका आहे. बिलीला २०२० मध्ये ५ ग्रॅमी पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. २०१६ मध्ये आलेल्या ‘ओशन आइज’ अल्बमने ती जगभर प्रसिद्ध झाली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.