Monday, March 2, 2026
Home बॉलीवूड ‘माझ्याशी लग्न करशील का?’, विकीने सर्वांसमोर विचारला होता कॅटरिनाला प्रश्न; ‘अशी’ होती सलमानची रिऍक्शन

‘माझ्याशी लग्न करशील का?’, विकीने सर्वांसमोर विचारला होता कॅटरिनाला प्रश्न; ‘अशी’ होती सलमानची रिऍक्शन

बॉलिवूड कलाकार कॅटरिना कैफ आणि विकी कौशल हे दोघे त्यांच्या रिलेशनमुळे खूप चर्चेत आहेत. माध्यमांमध्येही त्यांच्या रिलेशनबाबत बातम्या येत असतात. परंतु कॅटरिना आणि विकीने याबाबत कोणताही खुलासा केला नाही. काही दिवसांपूर्वी अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर याने सांगितले होते की, कॅटरिना आणि विकी रिलेशनमध्ये आहेत. यातच कॅटरिना आणि विकीचा एक जुना व्हिडिओ खूप चर्चेत आहे. यात सलमान खान देखील दिसत आहे. (Vicky kaushal ask katrina kaif will you marry me? in fornt of Salman Khan throw back video viral)

विकी,‌ कॅटरिना आणि सलमानचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या जुन्या व्हिडिओमध्ये विकी कॅटरिनाला विचारतो की, माझ्याशी लग्न करशील का? यावर सलमान खानचे हावभाव बघण्यासारखे आहेत. हा व्हिडिओ एका अवॉर्ड शोमधील आहे. ज्यामध्ये विकी आणि कॅटरिना स्टेजवर दिसत आहेत. सलमान खान त्याची बहिण अर्पितासोबत बसलेला आहे.

यावेळी विकी कॅटरिनाला म्हणतो की, “तू एक चांगला विकी कौशल शोधून लग्न का नाही करत?” यावर कॅटरिना हसायला लागते. तिथेच सलमान खान देखील तिच्याकडे बघून हसायला लागला. यानंतर विकी कौशल म्हणाला की, “आता लग्नाचा सिझन चालू आहे. मला वाटले तुझ्याही मनात असेल म्हणून विचारलं.” यावर कॅटरिना म्हणते की, “काय?” यानंतर विकी म्हणतो की, “माझ्याशी लग्न करशील का?” हे ऐकून सलमान खान त्याच्या बहिणीच्या खांद्यावर डोके ठेवतो.

थोड्या वेळानंतर कॅटरिना म्हणते की, “हिंमत नाहीये.” त्यावेळी सलमान पुन्हा हैराण होऊन कॅटरिनाकडे बघतो.

नुकतेच काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन कपूरने या गोष्टीची माहिती दिली होती की, कॅटरिना आणि विकी खरंच रिलेशनशिपमध्ये आहे. यानंतर कॅटरिनाने त्याला चांगलेच सुनावले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अनुष्का शर्माचा कौतुकास्पद निर्णय; ‘या’ कारणामुळे ऑनलाईन विकणार प्रेग्नंसीमधील कपडे

-अभिनेत्री विशाखा सुभेदारच्या शिरपेचात मानाचा तुरा, राज्यपालांच्या हस्ते ‘स्त्री शक्ती राष्ट्रीय पुरस्कारा’ने केले सन्मानित

-‘स्लमडॉग मिलेनियर’ फेम अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई; फोटो शेअर करत दिली ‘गुडन्यूज’

हे देखील वाचा