Wednesday, April 24, 2024

‘स्लमडॉग मिलेनियर’ फेम अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई; फोटो शेअर करत दिली ‘गुडन्यूज’

‘स्लमडॉग मिलेनियर’ हा सिनेमा सर्वांनाच आठवत असेल. सिनेमा आणि सिनेमाची कथा आजही पटकन सर्वांच्या डोळ्यासमोर येत असेल. ब्रिटिश ड्रामा असणारा हा इंडियन कथेवर आधारित सिनेमा तुफान गाजला. वेगवगेळ्या देशांमधील फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार मिळवणाऱ्या या सिनेमामुळे ए.आर.रहमान यांना ऑस्कर सारखा मानाचा पुरस्कार मिळवून दिला. या सिनेमाने अनेक कलाकारांना जागतिक पातळीवर ओळख मिळवून दिली.

याच सिनेमातील मुख्य अभिनेत्री असलेल्या फ्रीडा पिंटोला देखील प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवून देण्यात या सिनेमाचा मोठा हात आहे. आपल्या पहिल्याच सिनेमात फ्रीडाने अमाप लोकप्रियता मिळवली. याच फ्रीडाने नुकतीच तिच्या सोशल मीडियावर अकाऊंटवरून सर्वांसोबत एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. फ्रीडाने तिचा आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याचा फोटो पोस्ट करत ते दोघे लवकरच आई- बाबा होणार असल्याचे जाहीर केले आहे.

फ्रीडाने पोस्ट केलेल्या दोन फोटोंमध्ये ती तिच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच म्हणजेच कॉरी ट्रानसोबत दिसत असून या फोटोंमध्ये तिचे बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. यावरून आई होणार असल्याचा आनंद देखील तिच्या चेहऱ्यावर दिसत आहे. विशेष म्हणजे तिचं अजून लग्न झालेलं नाही. तिचा साखरपुडा झाला आहे. काळ्या रंगाच्या फ्लोरल ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे. हे फोटो शेअर करताना फ्रीडाने लिहिले की, “बेबी ट्रॉन येणार आहे.” सोबतच तिने हार्ट ईमोजी देखील पोस्ट केला आहे.

फ्रीडाची ही पोस्ट पाहून अनेक कलाकारांनी त्यांना शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. अभिनेत्री मृणाल ठाकूरने पोस्ट करत लिहिले की, “ओह माय गॉड, फ्रीडा आणि कॉरी खूप खूप अभिनंदन, मी खरंच आता खूप ओरडत असून डान्स करत आहे.” याव्यतिरिक्त नर्गिस फाखरीने लिहिले, “ओह माय गॉड, तुम्हा दोघांचे खूप खूप अभिनंदन.”

फ्रीडाने २०१९ साली कॉरीसोबत साखरपुडा केला होता. साखरपुड्याची बातमी देताना फ्रेडाने लिहिले होते की, “आयुष्य आता लक्षात येत आहे, जग आता लक्षात येत आहे, जुन्या काळातले प्रेमवीर प्रेमाबद्दल जे काही सांगायचे त्यात आता अर्थ जाणवत आहे. तू माझे प्रेम आहेस, तू माझ्या आयुष्यात आलास आणि आता इथेच कायम राहणार आहेस. कारण मी तुला थांबवणार आहे.”

फ्रीडाबद्दल सांगायचे झाले, तर ती एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तसेचर कॉरी हा एक प्रोफेशनल फोटोग्राफर आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-व्हिडिओ: आपल्या बॉयफ्रेंडसोबत पॅपराजींच्या कॅमेऱ्यात अंकिता लोखंडे कैद; आनंदाने साधला त्यांच्याशी संवाद

-भोजपुरी अभिनेत्रीने नवीन गाण्यातून सांगितली बॉयफ्रेंड बदलण्याची नवीन पद्धत; व्हिडिओला १४ लाख हिट्स

-अरे व्वा! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने रचलाय नवीन विक्रम; आठव्यांदा साकारणार ‘महादेवा’ची भूमिका

हे देखील वाचा