‘पप्पी दे पारूला’ म्हणत एका चेहऱ्याने लाखो हृदय चोरले. तो चेहरा म्हणजेच अभिनेत्री स्मिता गोंदकर. तिचे हे गाणे प्रचंड हिट ठरले. शिवाय या अल्बम गाण्याने तिला तूफान लोकप्रियताही मिळवून दिली. आजही प्रेक्षक जेव्हा हे गाणे ऐकत असतील, तर नक्कीच स्मिताचा चेहरा त्यांच्या डोळ्यासमोर येत असणार. ती सतत वेगवेगळे अल्बम सॉंग घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. शिवाय अभिनेत्री तिच्या सोशल मीडिया पोस्ट्समुळेही बरीच चर्चेत असते.
अलीकडेच स्मिताने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे सध्या चाहत्यांमध्ये चांगलेच पसंत केले जात आहेत. या फोटोमध्ये स्मिता समुद्राच्या किनारी दिसली आहे. फोटोत तिने पांढरे टी शर्ट आणि शोर्ट्स परिधान केले आहेत. तुम्ही पाहू शकता की, ती एका मोठ्या खडकावर झोपून, वर आकाशाकडे बघत आहेत. अभिनेत्रीचा हा अंदाज तिच्या चाहत्यांना खास पसंत पडल्याचे दिसून येत आहे.
या फोटोसोबत तिने आणखी काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती बीचवर फोटोसाठी पोझ देत आहेत. हा फोटो शेअर करत स्मिताने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “जेव्हा सूर्य चमकत असतो, वाऱ्याचा प्रवाह चालू असतो आणि आपण या सर्व जादूई निसर्गाचा आनंद घेत असतो, तो एक परिपूर्ण दिवस असतो. या कॅप्शनवरून असे लक्षात येते की, ती समुद्राच्या किनारी नैसर्गिक सौंदर्याची झलक घेत आहे. (smita gondkar shared photo from beach see here)
अभिनेत्रीच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांना प्रभावित केलं आहे. शिवाय तिचे अल्बम सॉंग सतत रिलीझ होत असतात. स्मिता मराठी बिगबॉसच्या दोन्ही सीझनमध्ये झळकली आहे. तसेच ती सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहे. याठिकाणी तिचे ५ लाखाहून अधिक फॉलोव्हर्स आहेत. जे तिच्या प्रत्येक पोस्टला भरभरून प्रेम देत असतात.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘स्लमडॉग मिलेनियर’ फेम अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई; फोटो शेअर करत दिली ‘गुडन्यूज’
-अरे व्वा! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने रचलाय नवीन विक्रम; आठव्यांदा साकारणार ‘महादेवा’ची भूमिका