‘वंडर वुमन १९८४’ हा चित्रपट कदाचित सर्वांनीच पाहिला असेल, नाही का? या चित्रपटात वंडर वुमनची भूमिका साकारलेली अभिनेत्री गॅल गॅडोटने आपल्या अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधले होते. गॅलच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. ती तिसऱ्यांदा आई बनली असून तिच्या घरी चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले आहे. तिने सोशल मीडियावर फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांसाठी ही बातमी दिली आहे. (Wonder Woman 1984 Fame Actress Gal Gadot Blessed With Baby Girl Share Family Photo On Social Media)
गॅलने अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या कुटुंबासोबतचा एक गोंडस फोटो शेअर केला आहे. या फोटोत दिसते की, गॅलसोबत तिच्या दोन मुली एलमा आणि माया आहेत. एका मुलीच्या कुशीत नुकत्याच जन्मलेली चिमुकली आहे. सोबतच तिचा पतीदेखील फोटोत दिसत आहे. सर्वांच्या चेहऱ्यावर चिमुकलीच्या आगमनाने आनंद दिसत आहे.
गॅलने हा फोटो शेअर करत लिहिले आहे की, “माझे प्रेमळ कुटुंब. मी खूप खुश आहे आणि थकलेलीदेखील. डॅनिएलाचे कुटुंबात स्वागत करण्यासाठी आम्ही सर्व खूप उत्साहित आहोत. तुम्हा सर्वांना खूप खूप प्रेम.” विशेष म्हणजे या कॅप्शनमधून तिने आपल्या मुलीचे नावही जाहीर केले आहे.
काही दिवसांपूर्वी अमेरिकन टीव्ही होस्ट जिम्मी किमेलने लाईव्हदरम्यान सांगितले होते की, तिने मुलगी मायाला कशाप्रकारे आपल्या प्रेग्नंसीची बातमी दिली होती. गॅलने म्हटले होते की, “हे पाहा माया, बाबांनी आईच्या पोटात एक रोपटे लावले आहे.” यासोबतच जेव्हा त्यांनी दोन्ही मुलींना गॅलच्या प्रेग्नंसीची बातमी दिली, तेव्हा कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती केक घेऊन आला होता. यानंतर दोघांनीही मुलांना म्हटले होते की, आम्ही एक्स्ट्रा कपही घेऊन आलो आहोत. तो कोणासाठी आहे हे माहिती आहे का? यानंतर गॅलने आपल्या पोटाकडे इशारा करत म्हटले होते की, लहान बाळासाठी.
गॅलच्या व्यावसायिक आयुष्याबाबत बोलायचं झालं, तर तिचा ‘वंडर वुमन १९८४’ चित्रपट सुपरहिट होता. या चित्रपटातील गेलच्या कामाची प्रशंसा जगभरातील प्रेक्षकांसह समीक्षकांनीही केली होती. जरी हा चित्रपट कोरोना काळात प्रदर्शित झाला होता, परंतु असे असले तरीही चित्रपटाने जबरदस्त कमाई केली होती. आता ती ‘रेड नोटिस’, ‘द फ्लॅश’ आणि ‘डेथ ऑन द नाईल’ या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.
मिस युनिव्हर्स घेतला होता भाग
गॅलने सन २००४ मध्ये ‘मिस युनिव्हर्स’ स्पर्धेत भाग घेतला होता. तरीही ती टॉप १० मध्ये सामील होऊ शकली नव्हती. या स्पर्धेतून बाहेर झाल्याच्या जवळपास ५ वर्षांनंतर गॅलला हॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. तिने ‘फास्ट एँड फ्युरियस’ या चित्रपटातून हॉलिवूड पदार्पण केले होते. तिने ‘वंडर वुमन’ या चित्रपटातही काम केले होते.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
‘मिनिमून’ साजरा केल्यानंतर, सोनाली कुलकर्णी त्याच उत्साहात पुन्हा कामावर झाली रुजू